य.ग. महाजन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
य.ग. महाजन (मे १२, इ.स. १९४१ - हयात) हे मराठी-भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षाकडून जळगांव लोकसभा मतदारसंघातून तेराव्या व चौदाव्या लोकसभेवर निवडून गेले[१]. नॉयडामधल्या कोब्रापोस्ट नामक प्रसारमाध्यम कंपनीने केलेल्या व आज तक या हिंदी दूरचित्रवाहिनीने प्रसारित केलेल्या ऑपरेशन दुर्योधन[२] या छुप्या कारवाईदरम्यान त्यांना ३५,००० रुपयांची लाच घेताना चित्रित केले. हे पैसे याने लोकसभेत विशिष्ट प्रश्न विचारण्यासाठी घेतल्याचा आरोप होता.
संदर्भ [संपादन]
- ↑ भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील अधिकृत अल्पचरित्र. (इंग्लिश मजकूर)
- ↑ बहल,अनिरुद्ध. ऑपरेशन दुर्योधन. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |