युसफ रझा गिलानी
युसफ रझा गिलानी (देवनागरी लेखनभेद: युसूफ रझा गिलानी; उर्दू: مخدوم سیّد یوسف رضا گیلانی ; रोमन लिपी: Yousaf Raza Gillani ;) (जून ९, इ.स. १९५२ - हयात) हा पाकिस्तानातील राजकारणी असून सध्या अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा १७ वा पंतप्रधान आहे. तो पाकिस्तान पीपल्स पार्टीचा उपाध्यक्ष आहे. याआधी इ.स. १९९३ ते इ.स. १९९७ या कालखंडादरम्यान तो राष्ट्रीय विधिमंडळाचा सभापती होता.
२२ मार्च, इ.स. २००८ रोजी पाकिस्तान पीपल्स पार्टीने पंतप्रधानपदासाठी त्याचे नाव जाहीर केले. पाकिस्तान पीपल्स पार्टीसोबत राजकीय आघाडीत भागीदार असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट), अवामी नॅशनल पार्टी, जमियत उलेमा-ए-इस्लाम व मुत्ताहीदा कौमी मूव्हमेंट इत्यादी पक्षांनी या नामांकनास पाठिंबा दिला. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडून गिलानी याने पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
[संपादन] बाह्य दुवे
- डॉन वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील युसफ रझा गिलानी यांची प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)
|
|||||||