युरोपियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोप युरोपियन ग्रांप्री
वालेन्सिया
Circuit Valensia street.svg
शर्यत माहिती
फेऱ्या ५७
सर्किटची लांबी ५.४१९ किमी (३.३६७ मैल)
शर्यत लांबी ३०८.८८३ किमी (१९१.९३१ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती २२
पहिली शर्यत १९८३
शेवटची शर्यत २०१२
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (६)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेर्रारी (७)

युरोपियन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत होती. आजवरच्या इतिहासात ही शर्यत युरोपामधील अनेक सर्किटांवर खेळवण्यात आली. २००७ सालापर्यंत ही शर्यत जर्मनीमधील न्युर्बुर्गरिंग येथे होत असे. २००८ ते २०१२ दरम्यान ही शर्यत स्पेन देशाच्या वालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली गेली. २०१२ अखेरीस ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.


बाह्य दुवे[संपादन]