यष्टिचीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यष्टीचीत या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिकेटच्या खेळात यष्टीचीत हा फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे.

यष्टीचीत होण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे -

  • टाकलेला चेंडू नो-बॉल असता कामा नये. वाईड चेंडू चालतो.
  • खेळत असलेला फलंदाज चेंडू मारण्याच्या प्रयत्नात आपली क्रीझ सोडून पुढे गेलेला असला पाहिजे.
  • चेंडू बॅटला न लागता यष्टीरक्षकाकडे गेला पाहिजे.
  • फलंदाज धाव काढण्याच्या प्रयत्नात असता कामा नये. असे असल्यास फलंदाज धावचीत समजला जाईल.
  • यष्टीरक्षकाने चेंडू यष्टीवर फेकून मारुन अथवा चेंडू हातात ठेवून आपल्या त्याच हाताने यष्टी मोडली पाहिजे.
  • या क्षणी फलंदाज क्रीझच्या बाहेर पाहिजे.

यष्टीचीत फलंदाजाबद्दल गोलंदाजाला व यष्टीरक्षकाला श्रेय देण्यात येते.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये