मोहिनीअट्टम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोहिनीअट्टम नर्तिका

मोहिनीअट्टम, हे केरळ मध्ये प्रगत आणि प्रसिद्ध झालेल्या भारतीय शास्त्रीय नृत्यकलेपैकी एक आहे [१]. कथकली ही केरळमधील दुसरी शास्त्रीय नृत्यकला होय.[२] विष्णूने अमृमंथना दरम्यान घेतलेल्या मोहक सुंदरीच्या अवतारावरून मोहिनीअट्टम नृत्यकलेला नाव मिळाले.[३]

मोहिनीअट्टमचे मूळ हे सगळ्या शास्त्रीय नृत्यकलेप्रमाणे नाट्यशास्त्रात आहे.[४] नाट्यशात्रानुसार हे नृत्य लास्य पद्धतीचे आहे. हे नृत्य नाजूकपणे प्रीतीचा भाव आणून केले जाते. मोहिनीअट्टम हे पारंपरिकरीत्या स्त्रीयांनी साकारलेले एकांकी नृत्य आहे. यासाठी गहन प्रशिक्षण दिले/घेतले जाते. या नृत्याला सहसा कर्नाटकी शास्त्रीय पद्धतीची साथ असते. संगीत, नृत्याद्वारे अभिनय केला जातो. संगीतातील गायन स्वतः नर्तिका किंवा स्वतंत्र गायकाद्वारे होते. ही गीते मनीप्रवाळा या मल्याळम आणि संस्कृत भाषेच्या मिश्र बोलीतून असते.

मोहिनीअट्टमचा सर्वात प्रथम अधिकृत उल्लेख सोळाव्या शतकातील व्यवहारमाला ह्या ग्रंथात आढळला आहे, पण नृत्यकलेचे मूळ हे खूप जुने असण्याची शक्यता आहे.[५] १८व्या शतकात या नृत्यकलेची पद्धतशीरपणे रचना झाली. ब्रिटिश काळात या नृत्यकलेकडे देवदासी, वेश्या व्यवसाय पद्धती म्हणून उपहासाने पाहिले जात असे. १९३१ ते १९३८ ह्या काळात विविध कायदे आणून यावर बंदी आणली गेली होती. बंदी विरोधात आंदोलन झाल्यावर ही बंदी अंशतः मागे घेण्यात आली.[६] सामाजिक आणि राजकीय संघर्षामुळे तसेच केरळमधील लोकांच्या कुतुहलामुळे मोहिनीअट्टमचे पुनरुज्जीवन झाले. या कवी वल्लर्धात नारायण मेनन यांचे मोठे योगदान आहे.

व्युत्पत्ति[संपादन]

मोहिनीअट्टम यास मोहिनीयाट्टम असेही संबोधले जाते. मोहिनीयाट्टमची वित्पत्ती मोहिनी ह्या शब्दापासून झाला आहे. हिंदू पुराणकथेत हिंदू देवता विष्णू यांनी घेतलेला प्रसिद्ध स्त्री अवतार. मोहिनीचा संदर्भ म्हणजे " दैवी मोहक स्त्री, सर्वश्रेष्ठ मोहित करणारी". हिंदू पुराणकथेत , देव आणि राक्षसाच्या युद्धात राक्षसांनी अमृत पळविले मग मोहिनीचा संदर्भ आढळतो. बहरलेले तारुण्य ,आपल्या बहरलेल्या तारुण्यात सुंदर कपडे घालून ती असुरांना तिच्या नादि लावण्यासाठी भक्तीचा उपयोग करते, जीला ते असुरांमध्ये अमृत वितरित करण्यास सांगतात. अमृत मिळविल्यानंतर मोहिनी ते देवतांना देते, तर असुरांना अमरत्व प्राप्त करण्यापासून वंचित ठेवते. मोहिनीची कथा पुरान प्रदेशानुसार वेगवेगळी असते, परंतु वैष्णव धर्मातील सर्वांत श्रेष्ठतेचा एक वैचारिक अवतार आहे. अट्टम एक मल्याळम शब्द आहे, आणि याचा अर्थ तालबद्ध गति किंवा नृत्य होय.[७] अशाप्रकारे मोहिनीअट्टम "एक जादूची, एक सुंदर स्त्री"चे नृत्य आहे.[८]

इतिहास[संपादन]

मोहिनीयाट्टम एक शास्त्रीय भारतीय नृत्य आहे, जे व्याख्या द्वारे नाट्यशास्त्राचे मूलभूत लिखाण करण्यासाठी त्याचे प्रदर्शन करण्याचा शोध लावते. नाट्यशास्त्राचा ग्रंथाचे श्रेय प्राचीन विद्वान भारत मुनींना दिला जाते. याचे पहिले संपूर्ण संकलन २०० ई.स.पू. आणि २०० ख्रिस्तोत्तर दरम्यान आहे, परंतु अंदाज ५०० मे.पू. आणि ५०० ​​इ.स. दरम्यान बदलतात. दोन प्रकारच्या नृत्यसंस्थेचे वर्णन: केले जाते. जोरदार, जास्त उर्जा तांडव नृत्य (शिव) आणि सौम्य, शांतपणे अनुकरणीय लासा नृत्य (पार्वती, शिवाची प्रेमिका). मोहिनीअट्टम नाट्यशास्त्रातील लास्य नाटकाच्या संकल्पनेचे आणि उद्दीष्टांचे पालन करतात.


Gallery[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "The Illustrated Encyclopedia of Hinduism: A-M".
  2. ^ "South Asian Folklore: An Encyclopedia : Afghanistan, Bangladesh, India, Nepal, Pakistan, Sri Lanka".
  3. ^ "India's Dances: Their History, Technique, and Repertoire".
  4. ^ " Hinduism". no-break space character in |title= at position 1 (सहाय्य)
  5. ^ " The Art of Mohiniyāttam". no-break space character in |title= at position 1 (सहाय्य)
  6. ^ " Scripting Dance in Contemporary India". no-break space character in |title= at position 1 (सहाय्य)
  7. ^ " Transcultural Negotiations of Gender". no-break space character in |title= at position 1 (सहाय्य)
  8. ^ " Indian Theatre: Traditions of Performance". no-break space character in |title= at position 1 (सहाय्य)