मोहम्मद हमीद अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोहम्मद हमीद अन्सारी

मोहम्मद हमीद अन्सारी (मराठी लेखनभेद: मोहम्मद हामिद अन्सारी ; उर्दू: محمد حامد انصاری ; रोमन लिपी: Mohammad Hamid Ansari ;) (एप्रिल १, इ.स. १९३७; कोलकाता, बंगाल - हयात) हे भारताचे १२वे उपराष्ट्रपती आहेत. ११ ऑगस्ट, इ.स. २००७ रोजी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी त्यांनी भारतीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद सांभाळले होते. अन्साऱ्यांनी भारतीय विदेश सेवेतील अधिकारीपदावरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर ते अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिरातीइराण या देशांत भारताचे राजदूत होते. इ.स. १९८४ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]