खय्याम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोहम्मद जहुर खय्याम या पानावरून पुनर्निर्देशित)
खय्याम
जन्म नाव मोहंमद झहूर खय्याम हाश्मी
टोपणनाव खय्याम
जन्म इ.स. १९२७
रहोन, पंजाब, भारत
मृत्यू १९ ऑगस्ट २०१९
जुहू मुंबई
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत
संगीत प्रकार हिंदी चित्रपटसंगीत
प्रसिद्ध चित्रपट कभी कभी (१९७६)
उमराव जान (१९८१)

खय्याम (जन्म : रहोन-पंजाब, १८ फेब्रुवारी १९२७; - मुंबई, १९ ऑगस्ट २०१९) हे भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.[१]

अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्‍नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.

खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन असलेले काही चित्रपट[संपादन]

  • आहिस्ता आहिस्ता
  • उमराव जान
  • कभी कभी
  • त्रिशूल
  • थोडीसी बेवफाई
  • दिल ए नादान
  • नूरी
  • बाजार
  • हीर रांझा (हा खय्याम यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट)

खय्याम यांचे संगीत असलेली प्रसिद्ध गाणी[संपादन]

  • ऑंखों मे हमने आपके सपने सजाए है (चित्रपट - थोडी सी बेवफाई)
  • आप की महकी हुई जुल्फों को (चित्रपट - त्रिशूल)
  • इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
  • कभी कभी मेरे दिल में (चित्रपट - कभी कभी)
  • कभी किसी को मुकम्मल जहॉं नहीं मिलता (आहिस्ता आहिस्ता)
  • गपुची गपुची गम गम
  • चांदनी रात में (दिल ए नादान)
  • जानेमन तुम कमाल करते हो (त्रिशूल)
  • जुस्तजू जिस की थी उस को तोना पाया हम ने (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
  • तुम अपना रंज ओ गम, अपनी परेशानी मुझे दो (चित्रपट - शगुुन, कवी : साहिर लुधियानवी)
  • तुम्हारे पलकों की चिलमनों में (नाखुंदा)
  • तेरे चेहरे से नजर नहीं हटती (चित्रपट - कभी कभी)
  • दिखाई दिए यूॅं
  • दिल चीज क्या है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
  • देख लो आज हम को
  • ना जाने क्या हुआ (दर्द)
  • परबतोंके पेडोंपर श्यामका बसेरा
  • प्यार का दर्द है (दर्द)
  • माना तेरी नज़र में (खानदान)
  • मुहब्बत बडे काम की बात है (त्रिशूल)
  • मेरे घर आयी एक नन्ही परी (कभी कभी)
  • मै पल दो पल का शायर हूॅं (चित्रपट - कभी कभी)
  • ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
  • ये मुलाकात एक बहाना है
  • सिमटी हुई ये घडियॉं (चंबल की कसम)
  • हजार राहें मुड़ के देखी (थोडी सी बेवफाई)
  • हैं कली कली के लब पर

ट्रस्ट[संपादन]

  • खय्याम यांच्या पत्‍नीने - गायिका जगजीत कौर यांनी - नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी आपली सर्व संपती- १२ कोटी रुपये दान दिले आहेत.

पुरस्कार[संपादन]

  • उत्तरप्रदेश सरकारचा पहिला संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार
  • पद्मभूषण

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ जयंत टिळक. अंदाज -ए-खय्याम. Loksatta (Marathi भाषेत). 14-03-2018 रोजी पाहिले. प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराची एक अमिट छाप असते. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)