महंमद घोरी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(मोहम्मद घौरी या पानावरून पुनर्निर्देशित)
| शिहाबउद्दीन महंमद घोरी | ||
|---|---|---|
| सुलतान | ||
| सुलतान शिहाबउद्दीन महंमद घोरी | ||
| अधिकारकाळ | इ.स. १२०२ - इ.स. १२०६ | |
| जन्म | इ.स. ११५० | |
| घोर, अफगानिस्तान | ||
| मृत्यू | १५ मार्च, इ.स. १२०६ | |
| दमिक, झेलम जिल्हा, पाकिस्तान | ||
| पूर्वाधिकारी | घिआसुद्दीन घोरी | |
| उत्तराधिकारी | कुतुबुद्दीन ऐबक | |
| वडील | मलिक बहाउद्दीन साम बिन हुसेन | |
महंमद घोरी (पूर्ण नाव- शिहाबउद्दीन महंमद घोरी) हा उत्तर भारतातील मुस्लिम राज्याचा संस्थापक होता. घुर किंवा घोर या तुर्की राजघराण्यात त्याचा जन्म झाला. घुर आधुनिक अफगाणिस्तानच्या पश्चिम मध्य भागात हेरात आणि गझनीच्या मधोमध आहे. मोहम्मद घौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांपैकी होता. याने पृथ्वीराज चौहानचा थानेसर येथील लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनतीची सुरुवात केली. भारतात इस्लामी राजवटीची सुरुवात मोहम्मद घौरीच्या आक्रमणानंतर झाली असे मानण्यात येते.