मॉस्को प्रमाणवेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशियामधील प्रमाणवेळा
वेळ कालमान
यूटीसी+०३:०० MSK−1: कालिनिनग्राद प्रमाणवेळ
यूटीसी+०४:०० MSK:  मॉस्को प्रमाणवेळ
यूटीसी+०६:०० MSK+2: येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ
यूटीसी+०७:०० MSK+3: ओम्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०८:०० MSK+4: क्रास्नोयार्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+०९:०० MSK+5: इरकुत्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+१०:०० MSK+6: याकुत्स्क प्रमाणवेळ
यूटीसी+११:०० MSK+7: व्लादिवोस्तॉक प्रमाणवेळ
यूटीसी+१२:०० MSK+8: मागादान प्रमाणवेळ
युरोपमधील प्रमाणवेळा:
फिका निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
पश्चिम युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
गुलाबी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
तपकीरी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पिवळा पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पूर्व युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
केशरी अति-पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
फिका हिरवा मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
फिक्या र्ंगाने दाखवलेले देश उन्हाळी प्रमाणवेळ पाळत नाहीत: अल्जिरिया, बेलारूस, आइसलँड, रशिया, ट्युनिसिया.

मॉस्को प्रमाणवेळ ही रशिया देशाच्या ९ प्रमाणवेळांपैकी एक आहे. ही वेळ यूटीसी+०४:०० ह्या कालमानासोबत संलग्न आहे. मॉस्को प्रमाणवेळ रशियाच्या पश्चिमेकडील बहुतेक सर्व युरोपीय भागात वापरात आहे व मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, सोत्शी इत्यादी मोठी शहरे ह्याच प्रमाणवेळेवर आहेत.

सरकारी पातळीवर देखील मॉस्को प्रमाणवेळेला रशियामध्ये मोठे महत्त्व आहे. सायबेरियन रेल्वेसहित रशियामधील सर्व रेल्वे मॉस्को प्रमाणवेळेवर धावतात. तसेच रशियामधील इतर प्रमाणवेळा मॉस्को प्रमाणवेळेच्या संदर्भात सांगितल्या जातात.