मुघल-ए-आझम (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुघल-ए-आझम (हिंदी: मुग़ल-ए आज़म ; उर्दू: مغلِ اعظم ; रोमन लिपी: Mughal-e-Azam) हा इ.स. १९६० साली चित्रपटगृहांत झळकलेला हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. के. आसिफ याने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यात पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमारमधुबाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुघल इतिहासातील कथाविषयावर हा चित्रपट आधारलेला आहे. या भव्य चित्रपटाच्या निर्मितीसाठी ९ वर्षांचा अवधी, तर १.५ कोटी भारतीय रूपये खर्च लागला. या चित्रपटाने भारतात कमालीचे व्यावसायिक यश मिळवत सर्वाधिक उत्पन्नाचा विक्रम केला. हा विक्रम शोले या इ.स. १९७५ सालातल्या हिंदी चित्रपटाने तोडेपर्यंत अबाधित राहिला. मुघल-ए-आझम चित्रपटातील अनेक गाणी लोकप्रिय झाली होती.

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये