मुक्ताईनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?मुक्ताईनगर
एदलाबाद
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

२१° ०३′ ०८″ N, ७६° ०३′ १८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२१.९७ चौ. किमी
• २४३ मी
हवामान
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा


• ४६ °C (११५ °F)
• २५ °C (७७ °F)
जवळचे शहर भुसावळ, जळगाव
जिल्हा जळगाव जिल्हा
तालुका/के मुक्ताईनगर तालुका
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
२३,९७० (2011)
• २५८/किमी
९२९ /
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
जनगणना कोड
आरटीओ कोड

• ४२५३०६
• +०२५८३
• ५२७०२८ (२०११)
• MH 19
महाराष्ट्र दालन: महाराष्ट्र  

मुक्ताईनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील एक धार्मिक शहर आहे. मुक्ताईनगर हे मुक्ताईनगर तालुक्याचे मुख्यालय आहे.[१]शहराच्या उत्तरेस असलेल्या तापी-पूर्णा नदीकिनारी संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण संत मुक्ताबाई यांचेे पुरातन देऊळ आहे. या देवळावरून इसवी सन २००० मध्ये शहराचे व तालुक्याचे नाव मुक्ताईनगर झाले.

मुक्ताईनगरला सर्वात जवळचे विमानतळ जळगाव येथे आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचे विमानतळही जवळच आहे. मुक्ताईनगर येथे मोठे बस स्थानक व आगार आहे महाराष्ट्रात कुठेही जाण्या-येण्यासाठी इथं बससेवा उपलब्ध आहे,इथे रेल्वे स्थानक नाही. मात्र मध्य रेल्वे बोदवड रेल्वे स्थानक येथुन जवळच १५ किमी, बोदवड-मुक्ताईनगर महामार्गावर स्थित आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग ५३ (पूर्वीचा क्रमांक ६) मुक्ताईनगर शहरावरून जातो. हा मार्ग मुक्ताईनगरला भुसावळ, जळगाव, धुळे, नागपूर या शहरांशी जोडतो आणि गावातून जाणारा एक राज्य-मार्ग - जामनेर, बोदवड, इच्छापुर आणि बुरहानपुरला जोडतो.

इतिहास[संपादन]

आधी च्या काळात सुंदरग्राम महतग्राम अदिलाबाद एदलाबाद असे नाव होते. वारकरी संप्रदायासाठी मुक्ताईनगर गावाचे विशेष महत्त्व आहे खांन्देशचे आराध्य म्हणून मुक्ताईनगर शहराकडे बघीतले जाते. याच गावी संत ज्ञानेश्वरांची बहीण संत मुक्ताबाई तापी नदीच्या वाळवंटात गुप्त झाली होती, अशी आख्यायिका आहे.त्या ठिकाणी संत मुक्ताई मंदिर कोथळी (प्राचिन आध्यात्मिक मंदिर) आणि १९३५ मध्ये तापी च्या काठावर मेहुण येथे बंकटस्वामी यांनी नदीपात्रात मुक्ताई मंदिर बांधले.परंतु तापी नदीवरील धरणामुळे हे लगेच पाण्याखाली गेले. नवीन मंदिर हे मुक्ताईनगर शहरात उत्तरेस बोदवड महामार्ग लगत आहे. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला इथं दर्शनासाठी वारकरी येत असतात. मुक्ताई संस्थान देखील या भाविकांचे स्वागत करतात.

मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगरसकट अनेक गावे पूर्णा नदी काठी वसलेली होती. प्रशासनाने नदी काठच्या गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले. पुराची भीती असल्यामुळे मुक्ताईनगरमधील घोडसगाव (जुने), कुंड इत्यादी नदीकाठच्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले.

==मुक्ताईनगरचा भूगोल== मुक्ताईनगर हे विधानसभा मतदारसंघ असुन मुक्ताई व बोदवड तालुका यात मोडतो, उत्तरेस सातपुडा पर्वत व रावेर तालुका आणि 'मध्य प्रदेश' राज्य, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस बोदवड,व जामनेर तालुका व पश्चिमेस भुसावळ तालुका. तापी नदी रावेर व मुक्ताबाई तालुका हद्दीत पच्छिमेकडे वाहते,आणि पुर्णा नदी मुक्ताईनगर तालुक्यातून वाहते,चांगदेव इथे पुर्णा नदी तापीला मिळते.

मुक्ताईनगर तालुक्याचा ईशान्य भाग घनदाट वनाने व्यापलेला आहे. गहू, ज्वारी, कापूस, ऊस, सोयाबीन ही पिके मुक्ताईनगर तालुक्यात घेतली जातात.

गावाच्या पूर्व-दक्षिणेस घोडसगाव, पिंपरी आकाराऊत आहे तर दक्षिणेस डोरमाळ, तरोडा, रुईखेडा ई. गावे आहेत.

हवामान[संपादन]

मुक्ताईनगरमध्ये उन्हाळ्यातील तापमान कमाल ४६° सेल्सीयस पर्यंत जाते[२]. हिवाळ्यात तापमान २७ °से.पर्यंत असते.

राजकारण[संपादन]

मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदारसंघात आणि रावेर लोकसभा मतदार संघात आहे.

भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील या १९६२मध्ये जळगावहून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्या मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) तालुक्याच्या १९६७ पासून ते १९८५ पर्यंत सतत चारवेळा आमदार राहिल्या. महाराष्ट्राचे भूतपूर्व कृषी मंत्री व महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरचे १९८९ पासून ते २०१९ पर्यंत आमदार होते. ते सन १९९९ आणि २०१४-२०१६ या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या पदावर होते. त्यांची सून रक्षा खडसे या २०१४ पासून मुक्ताईनगर(रावेरच्या) खासदार आहेत. इ.स. १९८९पासून हा तालुका भारतीय जनता पार्टीचा बनला. एकनाथ खडसे यांनी १९८९ पासून ते २०१९ पर्यंत सतत मुक्ताईनगरमधून भारतीय जनता पार्टी तर्फे निवडणूका लढवल्या होत्या,ते आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून विधानपरिषदेत आमदार आहे.

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्या जागेवर त्यांची कन्या रोहिणी खेवलकरला उमेदवारी मिळाली. परंतु त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार पाटील १९८० मतांनी निवडून आले. तेच २०१९पासून मुक्ताईनगरचे आमदार आहेत.

मुक्ताईनगर शहरात नगरपंचायत अंमलात आहे.


बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ लोकमत, ऑनलाईन. "मुक्ताईनगर हे जळगाव जिल्ह्यात स्तीत आहे". लोकमत. १७ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  2. ^ नेटवर्क, लोकमत न्यूझ (२०२०). "मे हीट, त्यात करोनाचा मार, जनता झाली बेहाल. जनजीवन विस्कळीत. सावदा, रावेर, मुक्ताईनगर, वरणगाव ४६ अंशांवर. रात्री ९ वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा". जळगाव, महाराष्ट्र.: लोकमत पेपर. pp. १.