मुंबई मोनोरेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मुंबई मोनोरेल ही मुंबई या शहरात बांधली जाणारी एक मोनोरेल प्रणाली आहे. ही भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली असणार आहे. 'एम. एम. आर. डी. ए.' ही संस्था या प्रणालीची ठेकेदार आहे. ही प्रणाली मुंबईतील जेकब सर्कल, वडाळा, माहुलचेंबुर या भागांत चालेल व तेथील लोकांना एक अन्य परिवहन सेवा उपलब्ध करून देईल.

इतिहास[संपादन]

विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई मध्ये भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली बांधण्याची परवानगी १३ ऑगस्ट, २००८ रोजी दिली.[ संदर्भ हवा ] बाँबार्डिअर ट्रान्स्पोर्टेशन, रिलायन्स एनर्जी व हिताची मोनोरेल यांच्या आणि लार्सन ऍण्ड टूब्रो व मलेशियातील स्कोमी रेल यांच्या दोन संघांतून ११ नोव्हेंबर, २००८ रोजी लार्सन ऍण्ड टूब्रो व स्कोमी रेल या संघाला २०२९ पर्यंत मोनोरेल बांधण्याचे व चालवण्याचे २४६० कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले.[ संदर्भ हवा ] मुंबई मोनोरेलचे बांधकाम जानेवारी २००९ ला चेंबुर ते माहुल या दरम्यान सुरु झाले व २६ जानेवारी २०१० रोजी १०८ मी.च्या मार्गावर परीक्षा-चलन पार पडले. डिसेंबर २०१० ला हा भाग सुरु होणे अपेक्षित आहे.

बाह्य दुवे[संपादन]