मुंबई इलाखा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई प्रांताचा नकाशा (इ.स. १९०९)

मुंबई इलाखा किंवा बाँबे प्रेसिडेन्सी (इंग्रजी: Bombay Presidency ; ) हा ब्रिटिश भारतातील प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई इलाख्यात समावेश होता.

मुंबई इलाख्याची राजधानी मुंबई ही होती.

मुंबई इलाख्याचे प्रशासकीय विभाग:-

१. उत्तर किंवा गुजरात

२. मध्य किंवा डेक्कन(दख्खन)

३. दक्षिण किंवा कर्नाटक

४. सिंध

मुंबई प्रांतातील जिल्हे:-

१. मुंबई शहर

२. अहमदाबाद

३. भरूच

४. खेडा

५. पंच महाल

६. सुरत

७. ठाणे

८. अहमदनगर

९. खानदेश(१९०६ मध्ये दोन जिल्ह्यांत विभाजन)

१०. नाशिक

११. पुणे

१२. सातारा

१३. सोलापूर

१४. बेळगाव

१५. विजापूर

१६. धारवाड

१७. उत्तर कन्नडा

१८. कुलाबा

१९. रत्नागिरी

२०. कराची

२१. हैदराबाद

२२. शिकारपूर

२३. थर आणि पारकर

२४. उत्तर सिंध सीमांत


स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांतातील सिंध प्रदेश हा पाकिस्तानात समाविष्ट झाला. गुजरात प्रदेश भारताचे एक घटक राज्य बनले. कर्नाटक प्रदेश हा तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडला गेला. कोकण, खानदेश आणि देश हे प्रदेश आणि मध्य प्रांतातील विदर्भ व वऱ्हाड आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.


हेही पाहा[संपादन]