माधुरी दीक्षित
| माधुरी दीक्षित | |
माधुरी दीक्षित-नेने |
|
| पूर्ण नाव | माधुरी श्रीराम नेने माधुरी शंकर दीक्षित(पूर्वाश्रमीचे) |
| जन्म | मे १५, इ.स. १९६७ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
| कार्यक्षेत्र | चित्रपट |
| राष्ट्रीयत्व | मराठी, भारतीय |
| भाषा | हिंदी (चित्रपट) मराठी (मातृभाषा) |
| प्रमुख चित्रपट | दिल, बेटा, हम आपके है कौन?, दिल तो पागल है, देवदास |
| पुरस्कार | फिल्मफेअर पुरस्कार (इ.स. १९९०, इ.स. १९९२, इ.स. १९९४, इ.स. १९९७, इ.स. २००२) |
| पती | डॉ. श्रीराम माधव नेने |
माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यात तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
अनुक्रमणिका |
[संपादन] आरंभीचे आयुष्य
माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी दांपत्याच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते.
[संपादन] चित्रपट कारकीर्द
माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब इ.स. १९८८ साली मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेयर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी बऱ्याच चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता.
इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीटखिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.
"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेयर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली.
इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७ च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले.
माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिच्या नृत्याची प्रशंसा झाली.
[संपादन] व्यक्तिगत आयुष्य
१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टो. २०११ मध्ये मुंबई मध्ये परत आली. [१]
[संपादन] पुरस्कार
[संपादन] फिल्म फेअर पुरस्कार
- १९९१: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट दिल
- १९९३: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट बेटा
- १९९५: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट हम आपके है कौन...!
- १९९८: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट दिल तो पागल है
- २००३: Filmfare Best Supporting Actress Award for Devdas
- २०११: Filmfare Special Award for completing 25 years in the Indian film industry
साचा:Col 2 Nominated
- १९८९: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Tezaab
- १९९०: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Prem Pratigyaa
- १९९२: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Saajan
- १९९४: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Khalnayak
- १९९५: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Anjaam
- १९९६: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Raja
- १९९६: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Yaraana
- २००१: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Pukar
- २००२: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Lajja
- २००८: फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Aaja Nachle
[संपादन] स्टार स्क्रीन पुरस्कार
- १९९४: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Hum Aapke Hain Kaun...!
- १९९५: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Raja
- १९९७: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Mrityudand
- २००२: Star Screen Award Best Supporting Actress for Devdas
साचा:Col 2 Nominated
- २०००: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Pukar
[संपादन] झी सीने पुरस्कार
- १९९८: झी सीने पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Dil To Pagal Hai
- २००२: Zee Cine Award for Best Actor in a Supporting Role - Female for Lajja
साचा:Col 2 Nominated
- २०००: झी सीने पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Pukar
- २००३: झी सीने पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Devdas'
[संपादन] आयफा पुरस्कार
Nominated
- २००१: आयफा पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Pukar
- २००३: आयफा पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री चित्रपट Devdas
[संपादन] Stardust Awards
Nominated
[संपादन] Honours and recognitions
- १९९७: "Kalabhinetri" award by the Government of Andhra Pradesh[२]
- २००१: National Citizen's Award
- २००१: Forbes named Dixit among the Top Five Most Powerful Indian Movie Stars.[३]
- २००८: Padma Shri, India's fourth highest civilian award by the Government of India[४]
- २००८: Honored at IFFLA Indian Film Festival of Los Angeles[५]
- २०११: Pearls Wave Awards - "Wave Silver Screen Queen Honour"
- २०११: Madhuri Dixit was voted as the most desirable Bollywood actress of 2011 in a poll conducted by HindiFilmNews.Com[६]
[संपादन] Filmography
[संपादन] बाह्य दुवे
- माधुरी दीक्षित आय.एम.डी.बी. संकेतस्थळावर (इंग्लिश मजकूर)
- ↑ Template error: argument शीर्षक is required.
- ↑ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
- ↑ http://www.forbes.com/2001/03/09/0309bollywood.html Forbes.com
- ↑ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत.. साचा:Dead link
- ↑ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत.. साचा:Dead link
- ↑ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |