माधुरी दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माधुरी दिक्षित या पानावरून पुनर्निर्देशित)
माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षित
जन्म १५ मे, १९६७ (1967-05-15) (वय: ५६)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८४ -
भाषा हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा
पती
श्रीराम नेने (ल. १९९९)
अपत्ये रयान, अरीण
अधिकृत संकेतस्थळ www.madhuridixit-nene.com

माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आरंभीचे आयुष्य[संपादन]

माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

माधुरी दीक्षित

माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर इ.स. १९८८ साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी काही चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता.

इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेर पुरस्कार मिळाला.

दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.

"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली.

इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले.

माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली.

व्यक्तिगत आयुष्य[संपादन]

१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली.

आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

एकोणीसशे नव्वदीचा काळ गाजवलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या आयुष्यावर एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. यानिमित्त कार्यकारी निर्माता म्हणून प्रियांका चोप्रा आणि एबीसी स्टुडियोज हिची निर्मिती करत आहे.

माधुरीने अमेरिकेत स्थायी झाल्यावर तिच्या कुटुंबासोबत जगत असताना काय गमतीजमती घडल्या हे या कॉमेडी सीरिजमध्ये दाखवण्यात येईल. ही सिंगल कॅमेरा सीरिज असेल. 'ग्रेज ॲनाटॉमी', 'क्वांटिको' यांसारख्या मालिकांना सुपरहिट करणारी टीम या आगामी प्रोजेक्टसाठी काम करते आहे. (ऑगस्ट २०१७ची बातमी).

पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

वर्ष पुरस्कार चित्रपट निकाल
१९८९ सर्वोत्तम अभिनेत्री तेजाब नामांकीत
१९९० प्रेमप्रतिज्ञा नामांकीत
१९९१ दिल विजयी
१९९२ साजन नामांकीत
१९९३ बेटा विजयी
१९९४ खलनायक नामांकीत
१९९५ अंजाम नामांकीत
हम आपके है कौन...! विजयी
१९९६ राजा नामांकीत
याराना नामांकीत
१९९८ दिल तो पागल है विजयी
२००१ पुकार नामांकीत
२००८ आजा नच ले नामांकीत
२०१५ डेढ इश्किया नामांकीत
२००२ सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री लज्जा नामांकीत
२००३ देवदास विजयी
२०११ फिल्मफेर विशेष पुरस्कार Overall contribution विजयी

मिळालेले स्टार स्क्रीन पुरस्कार[संपादन]

  • १९९४: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट हम आपके हैं कौन
  • १९९५: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट राजा
  • १९९७: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट मृत्य़ुदंड
  • २००२: देवदास मधील भूमिकेसाठी स्टार स्क्रीनकडून उत्कृष्ट सहकलाकारासाठीचे पारितोषिक

मिळालेली नामांकने

  • २०००: स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट पुकार

मिळालेले झी सिने पुरस्कार[संपादन]

  • १९९८: झी सिने पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट दिल तो पागल है
  • २००२: झी सिने उत्कृष्ट स्त्री सहकलाकार पुरस्कार - चित्रपट लज्जा

मिळालेली नामांकने

  • २०००: झी सिने पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट पुकार
  • २००३: झी सिने पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट देवदास'

आय. आय. एफ. ए पुरस्कार[संपादन]

नामांकने

  • २००१: आयफा पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट पुकार
  • २००३: आयफा पुरस्कार - उत्कृष्ट अभिनेत्री - चित्रपट देवदास

स्टार डस्ट पुरस्कार[संपादन]

नामांकन

  • २००८: स्टारडस्ट स्टार ऑफ दी इयर - चित्रपट आजा नचले

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

Dixit on the sets of Jhalak Dikhhla Jaa 5 along with her co-judges Remo D'souza (left) and Karan Johar (right)
  • १९९७: आंध्र प्रदेश सरकारने कलाभिनेत्री" पुरस्कार दिला.[१]
  • २००१: राष्ट्रीय नागरिक पुरस्कार
  • २००१: फोर्ब्सने माधुरी दीक्षितला हिंदी चित्रपटसृष्टीतील शिखरावरील ५ ताकदवर लोकांत स्थान दिले[२]
  • २००८: भारतीय चित्रपट उत्सव, लॉस एंजल्स येथे सत्कार
  • २०११: पर्ल्स वेव्ह पुरस्कार - "वेव्ह सिल्व्हर क्वीन सन्मान"
  • २०११: HindiFilmNews.Com ने घेतलेल्या मतदानात माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आकर्षक नटी ठरली[३]

फिल्मोग्राफी[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका दिग्दर्शक सह कलाकार इतर माहिती
१९८४ अबोध गौरी हिरेन नाग तपस पाल, शीला डेव्हिड, विनोद शर्मा
१९८५ आवारा बाप बरखा सोहनलाल कंवर राजेश खन्ना, मीनाक्षी शेषाद्री
१९८६ स्वाती आनंदी क्रांती कुमार शशी कपूर , शर्मिला टागोर , अकबर खान , मीनाक्षी शेषाद्री , विनोद मेहरा , सारिका
१९८७ मोहरे माया अप्पा दांडेकर नाना पाटेकर , सदाशिव अमरापूरकर , अनुपम खेर, आलोक नाथ
१९८७ हिफझत जानकी प्रयाग राज अशोक कुमार , नूतन , अनिल कपूर
१९८७ उत्तर दक्षिण चंदा प्रभात खन्ना रजनीकांत, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर
१९८८ खतरों के खिलाडी कविता
१९८८ दयावान नीला वेल्हू फिरोज खान विनोद खन्ना, फिरोज खान, अमरीश पुरी, आदित्य पांचोली
१९८८ तेझाब मोहिनी एन. चंद्रा अनिल कपूर , अनुपम खेर , चंकी पांडे , मंदाकिनी नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९८९ वर्दी जया
१९८९ राम लखन राधा सुभाष घाई राखी गुलझार , जॅकी श्रॉफ , अनिल कपूर , डिंपल कापडिया , गुलशन ग्रोवर , अमरीश पुरी , अनुपम खेर
१९८९ प्रेम प्रतिज्ञा लक्ष्मी बापू मिथुन चक्रवर्ती , विनोद मेहरा , रणजीत नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९८९ इलाका विद्या अझीझ सेजवाल धर्मेंद्र, संजय दत्त
१९८९ मुजरिम सोनिया उमेश मेहरा मिथुन चक्रवर्ती, नूतन
१९८९ त्रिदेव दिव्या माथुर राजीव राय नसीरुद्दीन शाह , सनी देओल , जॅकी श्रॉफ
१९८९ कानून अपना अपना भारती
१९८९ परिंदा पारो विधु विनोद चोप्रा अनिल कपूर , जॅकी श्रॉफ , अनुपम खेर , नाना पाटेकर नामांकित, ऑस्कर पुरस्कार
१९८९ पाप का अंत
१९९० महा-संग्राम झुमरी मुकुल आनंद विनोद खन्ना , गोविंदा
१९९० किशन कन्हैया अंजू राकेश रोशन अनिल कपूर, शिल्पा शिरोडकर , अमरीश पुरी
१९९० दिल मधु मेहरा इंद्र कुमार आमिर खान , सेड जाफ्री , अनुपम खेर जिंकला, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९० दीवाना मुझसा नाही अनिता वाय. नागेश्वर राव आमिर खान , खुशबू
१९९० जीवन एक संघर्ष मधु सेन
१९९० सैलाब डॉ. सुषमा मल्होत्रा दीपक बलराज वीज आदित्य पांचोली, शफी इनामदार
१९९० जमाई राजा रेखा ए. कोद्न्दारमी रेड्डी हेमा मालिनी, अनिल कपूर , अनुपम खेर , सतीश कौशिक
१९९० थानेदार चांद राज सिप्पी संजय दत्त, जीतेंद्र, जयाप्रदा
१९९१ प्यार का देवता देवी
१९९१ खिलाफ श्वेता
१९९१ १०० डेज देवी पार्तो घोष जॅकी श्रॉफ, मून मून सेन, जावेद जाफरी
१९९१ प्रतिकार मधु
१९९१ साजन पूजा लॉरेन्स डिसूझा संजय दत्त , सलमान खान फिल्मफेअर बेस्ट ॲक्ट्रेससाठी नामांकन
१९९१ प्रहार शिर्लेय नाना पाटेकर नाना पाटेकर, डिंपल कापडिया, गौतम जोगळेकर
१९९२ बेटा सरस्वती इंद्रकुमार अनिल कपूर, अरुणा इराणी, लक्ष्मीकांत बेर्डे, अनुपम खेर जिंकली, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९२ जिंदगी एक जुवा जुही प्रकाश मेहरा अनिल कपूर, अनुपम खेर, शक्ति कपूर
१९९२ प्रेम दिवाने शिवांगी मेहरा
१९९२ खेल सीमा /डॉ. जडी बुटी राकेश रोशन अनिल कपूर, सोनू वलिया, अनुपम खेर, माला सिन्हा
१९९२ संगीत निर्मला देवी & संगीता
१९९३ धारावी ड्रिम गर्ल सुधीर शर्मा शबाना आझमी, ओम पुरी
१९९३ साहिबान साहिबान
१९९३ खलनायक गंगा (गंगोत्री देवी ) सुभाष घई संजय दत्त, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, राखी गुलजार नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९३ फुल गुड्डी
१९९३ दिल तेरा आशिक़ सोनिया खन्ना /सावित्री देवी लॉरेन्स डिसूझा सलमान खान, अनुपम खेर
१९९३ आंसू बने अंगारे
१९९४ अंजाम शिवानी चोप्रा राहुल रवैल शाहरूख खान, जाॅनी लिव्हर, हिमानी शिवपुरी, दीपक तिजोरी नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९४ हम आपके है कौन ...! निशा चौधरी सूरज बडजात्या सलमान खान, मोहनीश बहल, रेणुका शहाणे, लक्ष्मीकांत बेर्डे, अनुपम खेर जिंकली, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९५ राजा मधु गरेवाल इंद्र कुमार संजय कपूर, मुकेश खन्ना नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९५ याराना ललिता /शिखा डेव्हिड धवन ऋषी कपूर, राज बब्बर, कादर खान नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९६ प्रेम ग्रंथ कजरी राजीव कपूर ऋषी कपूर, अनुपम खेर
१९९६ पापी देवता
१९९६ राज कुमार राजकुमारी विशाखा पंकज पाराशर अनिल कपूर
१९९७ कोयला गौरी राकेश रोशन शाहरूख खान, अमरीश पुरी
१९९७ महानता जेनया पिंटो
१९९७ मृत्युदंड केतकी प्रकाश झा शबाना आझमी, आयुब खान, मोहन आगाशे, ओम पुरी
१९९७ मोहब्बत श्वेता शर्मा रीमा राकेश नाथ अक्षय खन्ना, संजय कपूर
१९९७ दिल तो पागल है पूजा यश चोपरा शाहरूख खान, करिष्मा कपूर, अक्षय कुमार जिंकली, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
१९९८ बडे मियां छोटे मियां माधुरी दीक्षित डेव्हिड धवन अमिताभ बच्चन, गोविंदा खास दर्शन
१९९८ वजूद अपूर्वा चौधरी एन. चंद्रा नाना पाटेकर, मुकुल देव
१९९९ आरजू पूजा लाॅरेन्स डिसूझा अक्षय कुमार, सैफ अली खान
२००० पुकार अंजली राजकुमार संतोषी अनिल कपूर, नम्रता शिरोडकर, डॅनी डेंग्झोप्पा, ओम पुरी नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२००० गज गामिनी गज गामिनी /संगीता /
शकुंतला /मोनिका /
मोना लिसा
हुसैन शाहरूख खान, नसिरुद्दीन शाह
२००१ यह रास्ते है प्यार के नेहा दिपक शिवदासानी अजय देवगण, प्रीती झिंटा, विक्रम गोखले
२००१ लज्जा जानकी राजकुमार संतोषी मनीषा कोइराला, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, महिमा चौधरी, रेखा, अजय देवगण नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२००२ हम तुम्हारे है सनम राधा के. एस. आद्यामान शाहरूख खान, सलमान खान
२००२ देवदास चंद्रमुखी संजय लीला भन्साळी शाहरूख खान, ऐश्वर्या राय जिंकली, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
२००७ आजा नचले दिया अनिल मेहता कोंकणा सेन शर्मा, अक्षय खन्ना, कुणाल कपूर, दिव्या दत्ता, रणवीर शोरी, विनय पाठक नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२०१३ बॉम्बे टॉकीज माधुरी दीक्षित 'आपना बॉम्बे टॉकीज' या गाण्यात विशेष देखावा
२०१३ ये जवानी है  दीवानी मोहिनी अयान मुखर्जी रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, आदित्य रॉय कपूर, कल्की कोचलीन   स्पेसिअल  ॲंपिअरन्स  इन  सोंग  "घागरा "
२०१४ डेढ  इश्किया बेगम  पॅरा अभिषेक चौबे हुमा क्युरेशी, नसीरुद्दीन शाह नामांकित - फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२०१४ गुलाब  गॅंग रज्जो  सौमिक  सेन  जुही चावला गाण्यासाठी पण पार्श्व गायिका "रंगी सारभूलाबी"
२०१८ बकेट लिस्ट मधुरा साने तेजस देवस्कर सुमीत राघवन, रेणुका शहाणे
२०१९ टोटल धमाल बिंदू इंद्रकुमार अनिल कपूर, अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख
२०१९ कलंक बहार बेगम अभिषेक वर्मन वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर नामांकित, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार

संदर्भ[संपादन]

  1. ^ "AP honours Sridevi, Madhuri" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2010-08-12. ४ जानेवारी २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "India's Celebrity Film Stars" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  3. ^ "Madhuri is voted as the most desirable Bollywood actress of 2011" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-09-12. 2011-10-30 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]