माओ त्से तुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चीनी नेता माओ त्से तुंग यांना आधुनिक चीनचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १८९३ रोजी चीनच्या हुनन प्रांतातील शाओशान या गावी झाला. त्यावेळी चीन मध्ये मांचू घराण्याचे राज्य होते. या घराण्याविरूद्ध चीनमध्ये लोकशाही चळ्वळीला सुरूवात झाली. त्या आधी मांचू घराणे सुमारे २५०० वर्षे चीनवर राज्य करीत होते. १९११ मध्ये कोमिटांग पक्षाने राजेशाही संपुष्टात आणून लोकशाही स्थापन करण्यास पुढाकार घेतला. त्या पक्षाचे एक सक्रीय सदस्य म्हणून माओ ओळखले जात.

१ जानेवारी १९१२ रोजी सुन यात्सेन यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये नवे सरकार स्थापन करण्यात आले. त्यावेळी नव्या लोकशाही सरकार विरूद्ध लष्करी सत्ता उभी होण्याचा प्रयत्न करू लागली. सन् यत् सेन यांच्या मृत्युनंतर चँग-कै-शेक हे पार्टी प्रमुख झाले. तेव्हा मार्क्स-लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित होवून माओंनी चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. मात्र चीनमध्ये कामगाराऐवजी शेतकर्‍याला महत्त्व देण्यात आले. १९२० पासून माओ नव्या पक्षात सक्रीय झाले तर चँग-कै-शेक हे आपल्या कोमिटांग पक्षाशीच एकनिष्ठ राहिले.

सरंजामशाही विरूद्ध चळवळ उभी करणे हेच माओ यांचे मुख्य ध्येय बनले. या कामासाठी जुन्या कोमिटांग पक्षाचीही मदत घेण्याचे ठरले होते. १९२७ येईपर्यंत कोमिटांग-कम्युनिस्टांचे सख्य संपल्यावर कोमिटांग पक्षाच्या लोकांची सर्रास कत्तल सुरू झाली. तर दुसरीकडे माओ आणि त्यांच्या समर्थकांनी जमीनदारांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेऊन त्या शेतकर्‍यांना वाटण्यास सुरूवात केली. यामुळे माओंना लोकांचा पाठिंबा मिळू लागला. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर १९३० पासून चँग-कै-शेक यांच्या कोमिटांग पक्षाविरूद्ध कम्युनिस्ट रेड आर्मीचे युद्ध् सुरू झाले. कम्युनिस्टांविरुद्ध काढण्यात आलेल्या चार मोहिमांमध्ये चँगला अपयश आले. मात्र पाचव्या मोहिमेत चँगला यश आले, कम्युनिस्टांना युद्धातून माघार घ्यावी लागली.

हा पराभव माओ यांच्या जिव्हारी लागला. आपले ८५००० वर सैन्य, १५०० वर सैनिक घेऊन माओ चीनच्या ११ प्रांतात वर्षभर फिरत राहिले. इतिहासात प्रसिद्ध झालेली ही लाँग मार्च वर्षभराने शांक्सी प्रांतात पोहोचली. माओंना त्यांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविता आले होते, लोकांनी त्यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा दिला.

एकीकडे माओंचा लाँग मार्च सुरू असतांना जपानने चीनवर आक्रमण केले. यावेळी कोमिटांग आणि कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र येऊन जपानी सेनेविरूद्ध लढा द्यावा अशी भूमिका माओंनी घेतली. दोन्ही पार्टीतील मतभेद दिसताच चँगला अटक करण्यात आली. पण परक्या सेनेसमोर मतभेद उघड होवू नये म्हणून लगेच चँगची सुटका करण्यात आली. १९३८ ते १९४५ या काळात माओंच्या नेतृत्वात दोन्ही पक्षांच्या सहकार्याने जपानशी युद्ध झाले. १९४५ साली दुसर्‍या महायुद्धात जपानचा परभाव झाल्यावर अमेरिकेने कम्युनिस्टांविरूद्ध चँगला लष्करी मदत दिली. या मदतीमुळे १९४६ पासून कोमिटांग विरूद्ध कम्युनिस्ट असे सरळ युद्ध सुरू झाले. १९४९ साली चँगच्या कोमिटांग पार्टीचा दारूण पराभव झाला.

१ ऑक्टोबर १९४९ ला माओंच्या नेतृत्त्वात चीन मध्ये प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. या प्रजासत्ताकाचे सर्व कामकाज सोवियेत संघातील पद्धतीने करण्याचे ठरविले गेले. हळूहळू माओंच्या लक्षात आले की आपल्या देशातील कार्य पद्धती सोवियेत संघासारखी न ठेवता सत्तेचे विकेंद्रीकरण करून शेतकर्‍याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. लोकांकडून घेऊन लोकांना परत देणे (From Masses To Masses) अशी पद्धत सुरू झाली. ही नवी पद्धत वापरून शेती, विज्ञान, उद्योग अशा सर्व क्षेत्रात चीनने प्रगती केली.

दि. ९ सप्टेंबर १९७६ रोजी माओ यांचे निधन झाले.