महाराणा प्रताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराणा प्रताप
बि‍र्ला मंदिर, दिल्ली मध्ये महाराणा प्रताप यांचे शैल चित्र

महाराणा प्रताप (९ मे, इ.स. १५४० ते १९ जानेवारी, इ.स. १५९७) हा मेवाड म्हणजेच भारताच्या राजस्थानातील ऐतिहासिक योद्धा, लढवय्या जातीचा रजपूत राजा होता. राजपूत जातीतील सिसोदिया कुळात महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. महाराणा प्रताप हे त्यांच्या बादशाह अकबर यांच्या मुघल साम्राज्याविरुद्ध चाललेला संघर्ष आणि त्यांच्या शौर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

राज्याभिषेक[संपादन]

इ.स. १५६८ मध्ये, उदय सिंह दुसरे यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर चाल करुन आला. या हल्ल्यात राजे उदय सिंह आणि मेवाडचे राज घराणे किल्ल्यावर ताबा मिळवण्या आधी निसटले. उदय सिंह यांनी १५५९ मध्ये उदयपूर शहराची स्थापना केली. महाराज उदय सिंह आणी त्यांची सर्वात प्रिय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महराजा उदय् सिंह यांची इच्छा होती, पण राजे उदय सिंह यांच्या म्रुत्यूनंतर त्यंचा जेष्ठ पुत्र प्रताप यांनी परंपरेनुसार राज्य कारभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती.प्रताप यांच्या राज्याभिषेका आधी जगमल याला मुख्यमंत्री चुंदावट आणी तोमर रामशाह यानी राजवाड्याबाहेर घालवून दिले आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणुन घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यानी जगमल राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यांस पटवून दिले.