महाड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
महाड हे पश्चिम महाराष्ट्रतल्या कोकणातील एक शहर आहे.
महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटर तर पुण्यापासून १२० किलोमीटरवर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. पौराणिक, ऐंतिहासिक, सामाजिक व पारंपारिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे.
महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यांनी पावन झाले आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बऱ्यापैकी सुधारित शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे.
महाड मधील काही प्रेक्षणीय स्थळे:
- चवदार तळे
- रायगड किल्ला
- श्री वीरेश्वर महाराज मंदिर (शिवाजीकालीन मंदिर)
- गरम पाण्याचा झरा
- बुद्धकालीन गुफा
- शिवथरघळ (संत रामदास यांनी दासबोध या गुंफेत लिहिला).
- रम्य धबधबा व नैसर्गिक हिरवळ
- बाबासाहेब आंबेडकर यांची कार्यभूमी.
- जुने नदी बंदर. या ब्ण्दरातून छोटे व्यापारी किंवा प्रवासी अरब सागरात जात.