मलागा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मलागा Málaga |
|||
|
|||
|
|
|||
|
गुणक: |
|||
| देश | |||
| राज्य | आंदालुसिया | ||
| स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ७७० | ||
| क्षेत्रफळ | ३९५ वर्ग किमी | ||
| लोकसंख्या | |||
| - शहर | ५,६८,५०७ | ||
| - घनता | ३७९.९ प्रति वर्ग किमी | ||
| प्रमाणवेळ | यूटीसी + १:०० | ||
| www.malaga.eu | |||
मलागा हे स्पेनच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर (सेबियाखालोखाल) आहे. ५,६८,५०७ इतकी लोकसंख्या असलेले मलागा स्पेन्मधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या १०० किमी पूर्वेस व आफ्रिकेच्या १३० किमी उत्तरेस भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेले मलागा हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक व युरोपातील सर्वात दक्षिणेकडील मोठे शहर आहे.
युरोपातील सर्वात उबदार हिवाळे अनुभवणारे मलागा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे व पर्यटन हा येथील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे.
विख्यात चित्रकार व कलाकार पाब्लो पिकासो ह्याचा जन्म ह्याच शहरात झाला.
चित्र दालन [संपादन]
-
Gibralfaro Castle Malaga.JPG
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |