मराठी संकेतस्थळे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- this article is semi protected and one needs to log in before updating this page
- सूचना: हा लेख संपादीत करताना,कृपया,चर्चा पानावरील सर्व सूचना वाचून घेऊन त्यांचे आवर्जून पालन करावे
- मराठी संकेतस्थळांची ओळख (पहिल्या ओळख परिच्छेदात संदर्भ सोडून संकेतस्थळांचा कोणताही दुवा अंतर्भूत करू नका)
सर्नचे अभियंता टिम बर्नर-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरूवात केली[१].सर्नया संस्थेने ३० एप्रील १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२] सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो.१९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३]
सध्या जगाच्या कानाकोपर्यात असणार्या मराठी माणसांना इंटरनेटने एकत्र आणले आहे. आधुनिक जगाचे संवाद माध्यम असणार्या सायबर विश्वात अगदी आत्मविश्वासाने संचार करून मराठीनेही ‘अमृताशी पैजा जिंकणारी भाषा‘ हा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. तुकारामाची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिरी काव्य ते थेट गदिमा, पुलंपर्यंतची मराठी मनात घर करून बसलेली अनेक श्रद्धास्थाने इंटरनेटवर दिमाखाने झळकत आहेत. सध्या संपूर्णपणे मराठीत असलेल्या संकेतस्थळांची एकूण संख्या --- एवढी आहे.[ संदर्भ हवा ]
मराठी संकेतस्थळांच्या निर्मितीचा इतिहास
- ह्या विभागाच्या दर्जात सुधारणा करण्यात सह्योग करा
मराठीतील सुरवातीच्या संकेतस्थळांचे फाँट डाउनलोड करावी लागणारी संकेतस्थळे, डायनॅमिक एनकोडिंगमधील संकेतस्थळे, युनिकोडमधील संकेतस्थळे असे प्रमुख टप्पे आहेत.
सुरूवातीच्या काळात आंतरजालावर रोमन लिपीचा वापरकरत मराठी लिहिण्या शिवाय पर्याय नव्हता.मराठी पीपल२ हा याहू ग्रूप सर्वाधिक मराठीव्यक्तींना सदस्य करून रोमनलिपीचा वपर करून कार्यरत राहीला आहे.[ संदर्भ हवा ]डायनॅमिक फॉंट वापरून तयार केलेली मायबोली डॉटकॉम प्रथम मराठीतून संवाद घडवून आघाडी घेतली[ संदर्भ हवा ]. मराठीतील पहिले वृत्तपत्रीय संकेतस्थळ लोकमतचे www.lokmat.com हे १९९८ मध्ये सुरु झाले. या वृत्तपत्रात सर्वप्रथम मराठी डायनॅमिक फॉन्ट वापरला गेला. इ-सकाळ हे युनिकोडमध्ये बनविलेले पहिले मराठी वृत्तपत्रीय संकेतस्थळ. इ-सकाळने सुरवातीच्या काळात मराठीत रूपांतरणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
मराठीतील पहिले संकेत स्थळ
मायबोली.कॉम[२] गणेश चतुर्थी, १६ सप्टेंबर १९९६ .मराठीतला पहिला ब्लॉगसमूह मायबोली.कॉम या संकेतस्थळावर रंगीबेरंगी या नावाने डिसेंबर २००३ मधे सुरु झाला [४](आपले संकेतस्थळ मराठीतील पहिले असल्याचा अधिकृतरित्या दावा त्या संकेतस्थळाने केल्याचे आढळत नाही.[५]
अजय गल्लेवाले यांनी कुटुंबास मनोरंजनाचे साधन म्हणून निर्माण केलेल्या या संकेतस्थळाकडे, लवकरच, परदेशात (विशेषतः अमेरिकेत) सुस्थापित झालेल्या मराठी भाषकांनी सुसंवादाचे सक्षम साधन म्हणून पाहायला सुरूवात केली. हा संवाद अर्थातच इंग्रजी कळफलकावरून रोमन लिपीत मराठी लिहीण्यातून होत असे. पुढे देवनागरी टॅग लावून ’शिवाजी’ टंकात देवनागरीत मराठी लिहीण्याची सोय, मायबोलीवर महेश वेलणकरांच्या कौशल्याने निर्माण झाली. मग तिथे कायम रोमन लिपीत मराठी लिहीण्याची सवय झालेले जुने जाणते, आणि नव्याने मायबोलीस रुजू झालेले देवनागरीत दिमाखात लिहू शकणारे यांच्यात तुंबळ युद्धे सुरू झाली. भावना महत्त्वाची की भाषा इथपासून तर ऑफिसात बसून देवनागरी लिहीता येत नाही अशा स्वरूपाच्या अडचणींचा मुकाबला सक्षमपणे केला गेला. काही परदेशस्थ व्यक्तींना तर मायबोलीने एवढे वेड लावले की मायबोलीचे व्यसन कसे सोडवावे हा विषयच मायबोलीवर एके काळी चर्चिला जात असे. मायबोलीने आपल्या पत्रव्यवहारसुविधा, वधुवरसूचन आणि दिवाळीअंकविक्री इत्यादी आपल्या वापरकर्त्यांना लागणाऱ्या सोयी उपलब्ध करवून देत देत स्वावलंबन साधले. रंगीबेरंगी सदरात सभासदांना स्वतःच्या मालकीची जागा ठराविक आकार घेऊन देऊ केली आणि थोडक्यात मराठी ब्लॉगिंगलाच सुरूवात केली असे म्हणावे लागेल.[६]
"मायबोली" म्हणायच्या अगोदर १ महिना सुरु झाली होती. तिचं पहिलं नाव होतं "ऐसी अक्षरे". सनीव्हेल, कॅलिफोर्निया मधल्या उत्तरा आळतेकरांनी, मायबोली हे नाव सुचवून तिचं पुन्हा एकदा बारसं केलं. [७]
त्यावेळेस मराठी फॉंट मिळायला लागले होते पण ते कामचलाऊ होते. सुंदर नव्हते. अशातच श्रीकृष्ण पाटील आणि त्याच्या फॉंटबद्दल कळालं. हे आजोबा निवृत्त झाल्यावर मुलाकडे आले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी programming शिकले आणि त्यांनी अत्यंत सुंदर असे फॉंट केले. फॉंट प्रोग्रामिंग हा अतिशय किचकट आणि वेळखावू प्रकार समजला जातो. म्हणजे तेंव्हा तरी होता. आता बराच सुलभ झाला आहे. श्रीकृष्ण पाटलांचा या वयातला उत्साह आणि भारतीय भाषांसाठी केलेली धडपड पाहिल्यावर मायबोलीसाठी आणखी स्फुरण चढलं. त्यांचा एकच फॉंट मायबोलीसाठी विकत घेतला होता. पण कुणीतरी मराठीसाठी इंटरनेटवर करतय हे कळल्यावर त्यांनी त्यान्च्याकडचे सगळ्या प्रकारचे फॉंट मायबोलीला भेट दिले. [८]
"हितगुज सुरु व्हायच्या जवळ जवळ एक वर्ष अगोदर "बकुळीच्या फुलांची" सुरुवात झाली. सुरुवातीला सगळं संपादक स्वत्: शोधून संकलित करत असे. पण ते बरोबर दर सोमवारी प्रकाशित करणं हि थोडी कसरत झाली होती. रविवारी दुपारी किंवा वीकेंडला बाहेर कुठे लांब जाणं शक्य नसायचं. यापुर्वी आय. आय. टी. त असताना तंत्रचं संपादन केलं होते त्यामुळे चांगलं आणि नवीन सतत लिहिणं अवघड आहे याची कल्पना होती. पण नुसतं लिहिणंच नाही तर वेळेवर प्रकाशित करणं आणि ते दर सोमवारी असं महिनोंमहिने करणं याच्या मागे जरी फार कष्ट नसले तरी खाजगी आयुष्यावर नक्किच परिणाम करणारं होतं. सुदैवाने रविंद्र गोडबोलेची मायबोलीवरुनच गाठ पडली. त्याने कधिही लिहिलेली बकुळीची फुले भविष्यात आपोआप प्रसिद्ध होतील अशी सोय करून दिली. ती नसती तर बकुळीची फुलं पहिल्याच वर्षी कोमेजली असती."[९]
- अधिक माहिती मायबोलीया लेखात
मराठी संकेतस्थळांच्या विकासाचे टप्पे
एका मराठी संकेतस्थळावरील प्रतिक्रीयेचा भाग याचे विकिकरण आणि विस्तार करण्यास मदत करा.
अख्खी वेब २.० च्या दृष्टिकोणातून वाटचाल करत आहे .मराठी वेब ड्रुपॅल ४.० वरून ड्रुपॅल ६.० वर आली आहे.[१०]मनोगत ह्या संकेतस्थळामुळेच खर्या अर्थाने ड्रुपलवर आधारित संकेतस्थळांना चालना मिळाली.उपक्रम, मिसळपाव वर वापरण्यात येणार्या गमभनाचा प्रीकर्सर मनोगताचा आरटीई आहे हेदेखील विसरून चालणार नाही. मनोगत हे संकेतस्थळ, चांगल्या अर्थाने, ह्या सर्व संकेतस्थळांचे बाप आहे. मनोगताच्या प्रशासकांनी ड्रुपलच्या गाभ्यात आणि इतर मोड्यूल्जमध्ये बरेच बदल करून अनेक चांगल्या सुविधा दिल्या आहेत. शुद्धिचिकित्सक, छन्न प्रतिसाद, कोडी वगैरे. तसेच मनोगतचे वेगळे मोड्यूलच त्यांनी बनवले आहे. आणि आता मायबोलीही अखेर ड्रुपलकडे वळली आहे. आता कुठे मायबोलीने त्यांनी ड्रुपल स्वीकारायला सुरुवात केली आहे. मायबोलीसाठी दिशा हे ऍपलेट वेलणकरांनीच विकसित केले. ( जावास्क्रिप्टचा कोड तपासावा. )
मनोगत सदस्यांमध्ये हळूहळू तट पडू लागले. मग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले. त्यातून काहींनी ते संकेतस्थळ सोडले. एकूण काय तर हसतं-खेळतं-नांदतं एक मराठी संकेतस्थळ एकदम सदस्य वादात सापडलं! मग 'उपक्रम' नावाचे एक नवीन संकेतस्थळ आले. तिथे हे सगळे नाराज मंडळ सदस्य झाले आणि उपक्रम यशस्वी होण्यासाठी आपापल्या परीने झटू लागले. पण इथली ध्येयधोरणे काही मनासारखी नाहीत हे पाहून पुन्हा इथल्या प्रशासकांविरुद्ध ओरड सुरु झाली. रुसवे-फुगवे झाले आणि त्यातूनच मग जन्माला आले एक नवे संकेतस्थळ . ते म्हणजे हेच "मिसळपाव"! इथेही संस्थ सुरु झाल्या झाल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या.
मध्यंतरीच्या काळात "माझे शब्द" हे एक संकेतस्थळ बर्याच प्रमाणात लोकप्रिय होऊन बंद पडले. त्यातही वादावादी-भांडणे झालीच पण ते बंद पडण्याचे कारण ते नव्हे.
त्या मानाने "मायबोली" हे संकेतस्थळ चांगल्या पद्धतीने चालू आहे . मायबोलीवर
- तिथे कुणालाही विषयांतरासकट (सभ्य भाषेत) काहीही लिहायला परवानगी आहे. नो मॉडरेशन. नो पर्मिशन.
- माहितीपूर्ण किंवा अभिजात नसलेल्या पांचट गप्पा मारण्यासाठी "माय सिटी" सारखा दररोज स्वच्छता होणारा बुलेटिन बोर्ड आहे. त्यामुळे लोकांना तिथे आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी तरी यावेसे वाटते.
- कोणीही कुणालाही सभ्य भाषेत जाहीर शिव्या घालू शकतो. मात्र त्याची जबाबदारी संकेतस्थळचालक स्वतःवर न घेता सदस्यावरच ठेवतात. व इतर सदस्यच अशा उपद्रवी सदस्याला "सरळ" करतात.
- दिवाळी अंकासारखे अनेक उपक्रम मायबोलीचालक कित्येक वर्ष अगदी दृष्ट लागेल इतक्या सातत्याने राबवत आहेत. मागील दिवाळी अंकात. जयश्री यांच्या गायनाची ध्वनीफीतही जोडली होती. नवीन तंत्र स्वीकारण्याकडे त्यांचा असा कल दिसून येतो.
- संकेतस्थळासाठी पैसे लागतात. पैशाचे सोंग आणता येत नाही! त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी "रंगीबेरंगी" सारख्या योजना सुरू केल्या आहेत.
- याशिवाय तत्पर संपादक मंडळ. प्रश्नांची उत्तरे लगेच दिली जातात.
मायबोलीला सुरू होऊन १० वर्षे झाली आहेत. संकेतस्थळ तसे क्लोजनिट आहे. त्यामुळे दिवाळी अंकासारख्या गोष्टी राबवताना त्यांना फारसा त्रास होत नाही. दिवाळी अंक काढण्याचे सातत्या दृष्ट लागण्याजोगे असले तरी दर्जाबाबत मात्र असे म्हणता येणार. [११](दर्जा ठरवताना निर्मितिमूल्ये आणि साहित्यिकमूल्य दोहोंचा विचार करायला हवा, हे आलेच.) नवीन तंत्र स्वीकारण्याच्या बाबतीत मायबोली बरेच मागे आहे असे काही लेखकांनी नोंदवले आहे. ऑडियो टाकला म्हणजे तंत्र विकसित का?
मनोगताला सगळ्यात मोठा झटका विदागाराच्या कोसळण्यामुळे लागला. मनोगताच्या विदागाराला अपघात झाल्यावर येणार्या अडचणींना मनोगतकारांनी सदस्यांपर्यंत पोचवायला हवे होते. त्यानंतर झालेले 'मुस्कटदाबी'चे बरेचसे आरोप (एकूण एक नाही) हे अज्ञानमूलक होते. त्यामुळे मनोगताचा बराच अपप्रचार झाला.[१२](
बाकी संपादकीय, प्रशासकीय धोरणांबाबत बर्याच लोकांना तक्रार असू शकते, आहे. मनोगत हे संकेतस्थळ (एकहाती) चालवणे हा चालकांच्या हौशीचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी संकेतस्थळ कसे चालवावे ह्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपण फार फार तर वेळोवेळी त्यांना सल्ले देण्याचा आगाऊपणा करू शकतो.
शेवटी ज्याला त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. मनोगताचे आणि वेलणकरांचे श्रेय नाकारता न येण्यासारखे आहे.[१३]
मराठी संकेतस्थळांचे शैक्षणिक,सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान
- या विभागाचे विकिकरण करण्यात सहयोग करा
मराठी संकेतस्थळांचे शैक्षणिक,सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान बद्दल अजून जाणीवपूर्वक अभ्यास झाल्याची नोंद नाही.
१९८५ नंतर राजीव गांधींनी भारतात केलेली संगणक क्रांती,जवळपास त्याच काळात महाराष्ट्राचे त्त्कालीन मुख्यमंत्रीवसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थाना दिलेला प्रवेश,१९९१ नंतर झालेले आर्थिक उदारीकरण आणि त्याच कालावधीत आमेरीका आणि इतर पाश्चात्य देशात भारतीय संगणक अभियंत्यांना आणि कंपन्याना वाढलेली मागणी पूर्ण करताना शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या मराठी समुदायपण जगभर स्थलांतरीत झाला.आंतरजाल,इमेल आणि मराठी संकेतस्थळे यांनी या समुद्रापार राहणार्या,तसेच बृहन्मराठी समाजाची मातृभूमीशी मीत्रांशी तसेच मराठी भाषेची आणि संस्कृतीची नाळ जोडून ठेवण्याचे मोठे भरीव कार्य केले.[ संदर्भ हवा ]
या काळात मराठी ख-या अर्थाने ग्लोबल झाली. महाराष्ट्र भूमीत वावरणा-या मराठीने हे विश्वची माझे घर ही उक्ती सार्थ ठरवली. मराठी ग्लोबल होताना सहाजीकच तिची माध्यमे वेगळी आहेत. इथे पत्राना नव्हे तर ई - पत्रांना महत्व आहे. आपण ग्लोबल मराठीच्या काळात आहोत. जो काळ इंटरनेटच्या म्हणजेच शुध्द मराठीत महाजालाचा आहे. त्यामुळे सध्या महाजालावर मराठी काय म्हणते, हे जाणणे काळाची गरज आहे.
जेव्हा आपण नेटवर फेरफटका मारतो, तेव्हा लक्षात येते की आता इंटरनेटवर असंख्य मराठी संकेतस्थळे निर्माण झालेली आहेत. पूर्वी 'महाजालावर मराठी कुठे आहे? असा जो ओरडा व्हायचा त्याला ही जोरदार चपराक आहे. आणि महत्वाचे म्हणजे मराठीतील पहिले संकेतस्थळ मायबोली (www. mayboli.com) याला यावर्षीच तपपूर्ती झालेली आहे. 1996 सालच्या गणेशचतुर्थीला निर्माण झालेले हे सर्वांगसुंदर स्थळ .या संकेतस्थळामुळे जगातील मराठी लोक पहिल्यांदा एकत्र आले. त्यांच्यात चर्चा घडू लागली. शंका - समाधान सुरू झाले. नवनवीन लेखकांना त्यांचे लेख लोकापर्यंत पोहचवता येऊ लागले. हे संकेतस्थळ काळानुसार सतत बदलत राहिले. म्हणूनच, जवळजवळ 15 ते 20,000 सदस्यांसह (मात्र अक्टीव सभासद कीती ते माहीत नाही)हे स्थळ विविध उपक्रमांसह संस्कृतीरक्षणाचे देखील काम करत आहे.
संत तुकारामांची संपूर्ण अभंगगाथा इंटरनेटवर (www.tukaram.com) उपलब्ध आहे. [१४] तुकारामांचे तब्बल साडेचार हजार अभंग या संकेतस्थळावर मूळ मराठीत वाचायला मिळतातच, शिवाय महाराष्ट्रातील या महान संताचा परिचय करून देणारे हिंदी, स्पॅनिश, राशियन, जर्मनी आणि इंग्रजी भाषेतील लेखही या संकेतस्थळावर आहेत. ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी‘ मूळ स्वरूपात इंटरनेटवर नसली, तरी ‘कॉमन मॅन्स गीता‘ या मथळ्याखाली ज्ञानेश्वरीच्या सर्वच्या सर्व म्हणजे १८ अध्यायांचे निरुपण (www.di6qo.de/dhye/dnyeentry) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.chatrapati.shivaji.com या संकेतस्थळावर स्वराज्याची स्थापना करणार्या शिवाजी महाराजांचा परिचय आहे. शाहिरी वाङ्मयाचा परिचय करून देणार्या संकेतस्थळास www.powade.com या पत्त्यावर भेट देता येईल. पांडुरंग खाडिलकर, प्रल्हाद जामखेडकर आणि महादेव नानिवडेकर या शाहिरांचा सविस्तर परिचय, त्यांच्या रचना तसेच शिवकालीन अज्ञानदास ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शाहिरीरचनांना आढावा या संकेतस्थळावर घेण्यात आला आहे. त्यातील काही पोवाड्यांना ऑडिओ असल्याने ते ऐकता अथवा डाऊन लोड करता येतात. सहज सोप्या आणि प्रासादिक रचनांमुळे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, ते गदिमाही या सायबरविश्वात आपल्याला भेटतात. १३ ऑक्टोबर १९९८ मध्ये www.gadima.com हे संकेतस्थळ सुरू झाले असून, आजवर सुमारे ५३ लाख सायबरयात्रींनी या संकेतस्थळास भेट दिली आहे. मराठी काव्यविश्वात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणार्या कुसुमाग्रजांची कविताही www.kusumanjali.com या संकेतस्थळावर वाचता येऊ शकते. मराठीतील अनेक नामवंत दिनदर्शिका, प्रमुख वृत्तपत्रे, इंटरनेटवर आहेत. कळव्यातील स्मिता मनोहर या तरुणीने वेब डिझायनिंगचा डिप्लोमा करीत असताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असणार्या पु. ल. देशपांडे यांच्याविषयीचे www.puladeshpande.net हे संकेतस्थळ निर्माण केले आणि अल्पावधीतच हे संकेतस्थळ म्हणजे पु. ल. प्रेमींचा कट्टाच बनले. मराठीशी या ना त्या कारणाने संबंधित असणारी अशी अनेक संकेतस्थळे असली, तरी त्यातील काही मोजकी अतिशय महत्त्वपूर्ण आणि मनोरंजक आहेत. त्यात ‘मराठी मित्र‘ या संकेत स्थळाचा विशेष करून उल्लेख करता येईल. सुधीर, सतीश आणि सदाशिव कामतकर यांनी (www.marathimitra.com) हे संकेतस्थळ सुरू केले. आपल्याकडच्या मराठी माध्यमाच्या मुलांना जसे इंग्रजी शिकविले जाते. त्याच धर्तीवर मराठीशी सुतराम संबंध नसणार्यांनाही ही भाषा शिकता यावी, यासाठी इंग्रजी माध्यमाचा वापर करून या संकेतस्थळावर एक अभ्यासक्रमच उपलब्ध करून देण्यात आला आहे. मूळ इंग्रजी वाक्य, त्याचे इंग्रजी वर्णमालेतील मराठी भाषांतर आणि त्याच्या उच्चाराचा ध्वनी, अशा पद्धतीने नाव, सर्वनाम, क्रियापद, वाक्यप्रचार ते अगदी उभयान्वयी अव्ययापर्यंतचे संपूर्ण मराठी व्याकरण या संकेतस्थळावर इंग्रजीमधून देण्यात आले आहे. येथील शिकवणी वर्गातील एक नमुना - `kadhi' means `When', but `kadhi kadhi' means sometimes.' अशाच पद्धतीने ‘शतपावली‘ ते अगदी ‘पिठलंभात‘ या मराठी अस्मितेशी जोडल्या गेलेल्या अनेक विषयांची माहिती या मराठीमित्राकडे आहे. बदलत्या काळाची स्पंदने टिपून वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असणार्या ग्रंथालीनेही www.marathividyapeeth.org या संकेतस्थळाद्वारे जगभरातील मराठी माणसांशी संवाद साधला आहे. ग्रंथालीने या संकेतस्थळास मराठी विद्यापीठ म्हटले आहे. जगभरातील मराठी माणसांना महाराष्ट्रात काय सुरू आहे, याबाबत उत्सुकता असते. महाराष्ट्रातील नव्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असणार्या पुण्यातील ‘मुक्तांगण‘ या व्यसनमुक्ती केंद्राचेही www.muktangan.org हे संकेतस्थळ असून, ते इंग्रजी आणि मराठी भाषेत आहे. त्यात संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा परिचय, रुग्णांचे अनुभव, गोष्टी, प्रश्नावली इत्यादी तपशील आहे. डॉ. अनिल अवचटांच्या विविध लेखांमधून ओझरते दर्शन घडणार्या ‘मुक्तांगण‘ संस्थेला एकदा तरी भेट द्यावी, अशी अनेक मराठी माणसांची इच्छा असते, पण विविध कामांमुळे त्यांना ते जमतेच असे नाही. इंटरनेटमुळे ही संस्था आणि तिचे उपक्रम जगभरात कुठेही उपलब्ध होऊ शकतात. गेली शंभरहून अधिक वर्षे मराठी माणसाने ज्या कला प्रकारावर भरभरून प्रेम केले, त्या नाट्यविश्वातील घडामोडींची माहिती देणारे www.natak.com हे संकेतस्थळ आहे. नाट्यसंस्थांमध्ये सुयोगचे (www.suyogmumbai.com) संकेतस्थळ आहे, तर नाट्य कलावंतांमध्ये दिलीप प्रभावळकर (www.dilipprabhavalkar.com) आणि प्रशांत दामले (www.prashantdamle.com) यांची संकेतस्थळे आवर्जून भेट देण्याजोगी आहेत. आरोग्य डॉट कॉम (www.aarogya.com) हे आरोग्यविषयक इंत्यभूत माहिती देणारे संकेतस्थळ इंग्रजीप्रमाणेच मराठीतही उपलब्ध आहे. www.pustak.com हे संकेतस्थळ म्हणजे इंटरनेटवरील मराठी पुस्तकांचे दुकानच आहे. येथे प्रत्येक पुस्तकाची डॉलरमध्ये किंमत दिलेली आहे. याशिवाय महाराष्ट्रीयन.कॉम (www.maharashtrian.com), मराठी माती डॉट कॉम (marathimati.com), रामराम पावनं डॉट कॉम (www.ramrampavna.com),, मराठी वर्ल्ड डॉट कॉम (www.marathiworld.com) अशी इतरही काही मराठी संकेतस्थळे आहेत. बर्याचदा मराठी संकेतस्थळे तयार करताना तांत्रिक समस्या भेडसावतात.केवळ मराठी भाषिक संगणक आणि आंतरजालीय तांत्रिक समस्यांची चर्चा घड्वण्याच्या दृष्टीने लोकायत हे संकेतस्थळ उपलब्ध आहे.
प्रत्येक संकेतस्थळाला क्वचीत मर्यादा पडतात. त्यामुळे त्यानंतरच्या काळात मराठी माणसाला अभिव्यक्त होण्यासाठी विविध संकेतस्थळांची निर्मीती केली गेली. 'मनोगत' व 'उपक्रम' ही त्यापैकीच (www.manogat.com & www.mrupakram.org) ही संकेतस्थळे आजही जोषात चालू आहेत. या सर्व स्थळांवर अगदी इस्लामपूरपासून ते कॅलिफोर्निया पर्यंतचे सदस्य आहेत. व ते या स्थळांवर पाककृती ते जागतिक विषय यांवर चर्चा करत असतात. 'मनोगत' ने तर शुध्द मराठी लिखाणाची सोय उप्लब्ध करून दिलेली आहे. तर 'उपक्रम' ने खरडवही व व्यक्तिगत निरोप यांची सोय दिलेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण घरी बोलतो त्याप्रमाणे बोलणे शक्य झाले आहे.
यानंतर, म्हणजे सर्वात महत्वाचे व सध्या खुपच प्रसिध्द असलेले 'मिसळपाव' हे संस्थळ (www.misalpav.com) वरील तिन्ही स्थळांचा उत्तम मिलाफ त्यांनी साधला आहे. गेल्या अवघ्या दिड वर्षात इथे विविध विषयांवरचे 5000 लेख आहेत. यावरून आपण महाजालावरच्या मराठीच्या प्रगतीचे विश्लेषण करू शकतो. महत्वाचे म्हणजे इथे अगदी 'ग्राफिटी' कार अभिजीत पेंढारकर ते अर्थविश्लेषक रामदासापर्यंत सर्व लेखक आहेत. त्यामुळे ख-या अर्थाने मराठीविश्व जवळ आलेले आहे. याशिवाय बजबजपुरी, मी मराठी इ. स्थळेही बाळसे धरत आहेत.
याशिवाय विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांची स्वतःची मराठी संकेतस्थळे आहेत.नुकतेच मनसेचे एक अतिउत्तम ,आपण कल्पनाही करु शकणार नाही असे संस्थळ सुरु झालेले आहे.(www.manase.org) त्यामुळे महाजालावर मराठी लोकशाही मोठया प्रमाणावर नांदते आहे.असे म्हणायला हरकत नाही.
महाजालावर विविध विषयांना वाहून घेतलेली अनेक स्थळे आहेत. अगदी मराठीतून संगणक - प्रश्न सोडवणारे लोकायत (www.lokayat.com) असो, कलाकारांना वाव देणारे मानबिंदू(www.maanbindu.com) हे संकेतस्थळ असो, जुनी नवी मराठी गाणी उप्लब्ध गाणी उप्लब्ध करणारे आठवणीतील गाणी(http://www.aathavanitli-gani.com/) असो किंवा माझ्या मराठीचे गायन असे म्हणणारे, मराठी माती(http://www.marathimati.com/) असो किंवा गणपतीला वाहलेले एकमेव .कॉम(http://www.ekmev.com/ekmev_marathi_new.htm) असो. हे प्रत्येक स्थळ उत्तम आहे. याशिवाय अगदी अवकाशावर आधारित अवकाशवेध.कॉम (http://www.avakashvedh.com/)आहे किंवा मराठीतून ग्रीटींग पाठवण्याचे मराठी वर्ल्ड(http://www.marathiworld.com) आणि वन स्मार्ट क्लिक आहे अगदी चित्रपटांना वाहिलेले मराठी मुव्ही वर्ल्ड असा कोणताही विषय नाही की ज्यावर मराठी भाषेत संकेतस्थळ नाही. अगदी दासबोधापासून ते आजच्या कवीपर्यंत प्रत्येक विषयावर वेगवेगळी संकेतस्थळे आहेत जी विविध लोकांना उपयोगी पडतात. याशिवाय कुसूमाग्रजांपासून ते जी पर्यंत प्रत्येकाचे लिखाण त्यांच्या विश्वस्तांनी महाजालावर उप्लब्ध झाले आहे. फक्त मराठी गझलांना वाहिलेले संस्थळ देखील उत्तमपणे चालू आहे. अगदी मराठी कटटा (www.marathikatta.com) उत्तमपणे चालू असून शिवाजी महाराज ते सावकरांपर्यंत प्रत्येकाचे कार्य महाजालावर उप्लब्ध आहे. (www.rajashivaji.com) आणि (www.savarkar.org) एकूणच काय, तर मराठीचा परिघ प्रचंड वाढला आहे. इतकी संस्थळे आहेत की त्यांची ओळख करून दयायला स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल. नेटवरून निघणारे 4 - 5 दिवाळी अंक ते ई - पुस्तके असे सर्व विषय हाताळणे अवघड काम आहे, पण आपल्या मराठी माणसांनी ते आव्हान लिलया पेलले आहे. म्हणूनच या सर्वांचे रंगरूप उत्तम आहे. विश्व संमेलनाचे संस्थळही उत्तम होते. (www.sfssahityasamelan.org) तांत्रिक बाबतीतदेखील ही स्थळे उत्तम आहेत. याचा प्रत्यय आपणाला (www.marathitube.com) सारख्या संस्थळातून मिळतो.[१५]
पारिभाषिक शब्दांची निर्मिती आणि चपखल मराठी शब्दांचे रूजवणे
संकेतस्थळांवर मराठीत लेखन करताना येणारी मोठी अडचण म्हणजे इंग्रजीशब्दांना चपखल मराठी पारिभाषिक शब्द योजना.या करिता विवीध मराठी संकेतस्थळांवर विशेष चर्चा पाने निर्माण करून चर्चा केल्या जातात व मराठी शब्द आणि शब्दभांडार विक्शनरी अशा संकेतस्थळांच्या माध्यमातून संकलन होते.त्या प्रमाणेच मराठी शब्दांना परत रूजवण्याचे प्रयत्न पण बर्याच संकेतस्थळाच्यामाध्यमातून होतात.
मराठी संकेतस्थळां समोरची तांत्रिक आव्हाने
आंतरजालावर या संकेतस्थळांनी मराठी आणले तरी त्यांचा उद्देश त्या त्या संकेतस्थळाची भरभराट व्हावी असा होता का खरोखरच मराठीची भरभराट व्हावी असा होता? उदा. अनेकदा मनोगतावर इथले सॉफ्टवेअर मुक्तस्रोत करावे अशा मागण्या येऊनही मनोगतकारांनी ते टाळले. (त्यात काही धोरणाचा भाग असेल आणि चालक म्हणून तो त्यांचा निर्णय आहे). पण त्यामुळे नवीन संकेतस्थळ तयार करणार्याना अडचण आली. यावर सगळ्यात पहिल्यांदा देवनागरीमध्ये मुक्तस्रोत सुविधा निर्माण करणार्या ओंकार जोशींना विसरून चालणार नाही. त्यांनी कुणालाही फुकट देवनागरीत लेखन करता येईल अशी सुविधा निर्माण केली हा मराठी संकेतस्थळांच्या वाटचालितला मैलाचा दगड आहे.
मराठी ओपनसोर्स या याहू ग्रूपचे सभासद कुठलाही गाजावाजा न करता विविध सॉफ्टवेअरचे स्थानिकीकरण आणि मराठीत भाषांतर करत आहेत. मराठी संकेतस्थळांच्याही पलिकडेही आंतरजालावर मराठी आहे हे विसरून चालणार नाही.
आज द्रूपाल आणि गमभन प्रणालीवर अनेक मराठी संकेतस्थळे तयार होत आहेत. पण काही अपवाद वगळता मराठी संकेतस्थळांच्या चालकांपैकी कुणीही त्याना सापडलेल्या त्रुटी आणि त्यावरचे उपाय परत मुक्तस्रोत समाजाला दिलेले दिसत नाही. सगळ्यात पहिल्यांदा हा विचार मिलिंद भांडारकर यानी इथेच मनोगतावर मांडल्याचे आठवते.
आज गमभन आणि द्रूपल यांना दिलेले योगदान (इश्यू क्यू) पाहिले तर लोकायत. कॉम, मायबोली.कॉम यासारख्या मोजक्याच संकेतस्थळांनी आपआपल्या परीने हे मुक्तस्रोत समाजाचे ऋण फेडायचा प्रयत्न केलेला दिसतो. माझे स्वतःचे संकेतस्थळ चांगले चालावे म्हणून लठ्ठालठ्ठी चालू असताना या संकेतस्थळांनी सगळ्याच मराठी संकेतस्थळाना फायदा व्हावा म्हणून केलेले प्रयत्न, ही बदलती मानसिकता हा नक्कीच आंतर्जालावरील मराठीचा एक मोठा टप्पा ठरावा. [१६]
संकेतस्थळेही कोणत्याही साक्षर व्यक्तिस सहज हाताळण्याजोगा मार्ग आहे.परंतू सरळ सामान्य उपयोग कर्त्यांच्या हातात पोहचण्याकरिता आडचणीचा मार्ग अजूनही लांब आहे.संकेतस्थळांचे उपलब्ध होणे संगणक व इंटरनेट सुविधेच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.संगणक आणि इंटरनेट जेथे उपलब्ध आहेत तेथेही मराठी फॉंट्स उपलब्ध असतील याची खात्री नसणे त्या शिवाय ऑपरेटींग सिस्टीम्स आणि बाऊजर्स आजही प्राधान्याने इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत.
मराठी संकेतस्थळे सुद्धा नवनवी तांत्रिक प्रगतीस सामावून घेण्याची आव्हाने पेलण्याचा शक्यतो प्रयत्न करित असतात.सध्या मोबाईल फोन्सवर मराठी संकेतस्थळांची उपलब्धता हे असेच एक आव्हान आहे.[१७] महाजालावरील मराठीच्या इतिहासास एक तांत्रिकतेचा पदर आहे. जे तांत्रिक टप्पे दरम्यानच्या काळात गाठले गेले त्यांची काळाबरहुकूम नसली तरी टप्प्यांबरहुकूम दखल घ्यायलाच हवी.
महाजालावर मराठीची सुरूवात खरे तर परदेशस्थ भारतीयांनी काढलेल्या संस्कृत डॉक्युमेंटस या संकेतस्थळावरून झाली. या संकेतस्थळाचा उद्देश भारतीय भाषांतील प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याच्या संकलनाचा होता आणि आहे. त्यांनी इंग्रजी कळफलकावरून देवनागरी लिहीण्याची जी पद्धत विकसित केली तिला आय. ट्रान्स. (इंडियन लँग्वेज ट्रान्सलिटरेशन) म्हणतात. त्याच पद्धतीवर हल्लीच्या सर्व देवनागरी लेखनसुविधा आधारलेल्या आहेत. या स्थळावर हिंदी गाण्यांच्या शब्दांचे जे अभूतपूर्व संकलन करण्यात आलेले आहे त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. आय.ट्रान्स सॉन्ज बुक (Itrans Songs Book) या नावाने ते आजही दिमाखात स्थिर आहे.
कोकण रेल्वेच्या विकसनादरम्यान शुषा (शिवाजी) टंकांचा विकास होऊन ते वापरासाठी खुलेपणाने उपलब्ध झाले. ही मराठी भाषेच्या तांत्रिक विकासाची पहिली मोठी पायरी होती. मायबोली डॉट कॉमवरही देवनागरी लेखन त्यामुळेच शक्य होऊ शकले होते. दरम्यान फॉंटोग्राफरचा उपयोग करून किरण फाँटस, शनिपार फाँट इत्यादी अनेक फाँटस विकसित करून त्याआधारे संकेतस्थलेही बनवली गेली होती. अशाचपैकी बरहा फाँटसने आज आय.एम.ई. काढून सुंदर युनिकोड एकात्मिक लेखनाची सोय केलेली आहे. मात्र या सर्वात मनोगतावर उपलब्ध असलेली संपादनसुविधा सर्वात सशक्त आणि सोयीस्कर असल्याने लोक तिचा वापर करून इतर लेखनही करू लागले होते. महाजालापासून दूर असता वापरता येईल अशा युनिकोड संपादकाची खरीखुरी निकड मग जाणवू लागली होती. अशावेळी ॐकार जोशींनी गमभन उपलब्ध करून दिले. आजमितीला गमभनवर आधारित संकेतस्थळेच जास्त आहेत. मराठीच्या विकासास यामुळे सशक्त आधार मिळाला.
२००६ मध्ये राज्य मराठी विकास संस्थेने जनभारती (सीडॅक) आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञानविभागाच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची पहिली खुली स्पर्धा आयोजित केलेली होती. तिच्यात प्रभादेवी मुंबईच्या सचिन पिळणकरांच्या 'अवकाशवेध' ह्या संकेतस्थळाला पहिले पारितोषिक मिळाले. डॉ. बाळ फोंडके (सुप्रसिद्ध विज्ञानकथालेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक) आणि प्रा. मं. गो. राजाध्यक्ष (जे जे स्कूल ऑफ अप्लाईड आर्टस चे माजी अधिष्ठाते) यांव्यतिरिक्त त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आलेले होते. या स्पर्धेत महेश वेलणकरांच्या मनोगताचा दुसरा क्रमांक आला होता. दुवा क्र. १. पिळणकरांच्याच धरतीवर मग ट्रेक्क्षितिज हे फ्लॅशवर आधारित पदभ्रमणास वाहिलेले नितांतसुंदर संकेतस्थळ डोंबिवलीच्या मुलांनी तयार केले. आपल्या मनोगती जयंतराव कुलकर्णींचा अक्षय यात अग्रभागी होता.
यास्पर्धेनंतर लोकांना शासन याबाबतीत काही करत असल्याचे पहिल्यांदा जाणवले. मात्र सीडॅक यापूर्वीच टंकनिर्मिती, भारतीय भाषांतील परस्परांतील रूपांतरण (ट्रान्सलिटरेशन), शब्दकोषनिर्मिती, प्रकाशकीय शब्दओळख (ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन) इत्यादी पैलूंवर काम करू लागलेली होती. मग प्रमोद महाजनांनी भारत सरकारचे माहिती तंत्रज्ञानखाते सुरू केले आणि भारतीय भाषांच्या विकासाकरता ठोस पाऊले उचलली. आय. आय. टी. पवई, आय. आय. टी. कानपूर इत्यादी संस्थाही आपापल्यापरीने तांत्रिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झटत होत्याच. या साऱ्यांचा परिपाक म्हणून भारत सरकारने युनिकोडनिर्मितीमध्ये सहभाग निश्चित केला. मनोगत मात्र युनिकोडचा अंमल करण्यात सर्वात आघाडीवर होते. युनिकोडचा मग मायबोलीनेही स्वीकार केला. पुढे सकाळने युनिकोडीकरण केले. आणि आता तर युनिकोड जनरहाटीचा भाग झालेले आहे.
भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याच्या विद्यमाने भारतीय भाषांच्या विकासाखातर निराळे संकेतस्थळ मग काढण्यात आले. त्याद्वारे अनेक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दयानिधी मरान त्या खात्याचे मंत्री असतांना तर देवनागरी लेखनाची सर्व संसाधने असलेली सीडी. त्यांनी मोफत वाटली. मी त्याच काळात माझे नाव तिथे नोंदवलेले असल्याने मलाही ती मिळालेली आहे. आता युनिकोडच्या नव्या संस्करणाबाबतही हे संस्थळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
दरम्यान वृत्तपत्रांनी आपापले युनिकोडीकरण सुरू केले. त्यांची त्यांची परस्परसंवादानुकूल संकेतस्थळेही उदयास आली. वाहिन्या आपापल्या उद्दिष्टांना साजेशी संकेतस्थळे मराठीत काढू लागल्या. अनुदिन्या लिहीणारेही सरसावले आणि सुरेश भट डॉट कॉम, गदिमा, पुल यांची संकेतस्थळे महाजालावर दिसू लागली. कवितेस, विशेषतः गझलेस बहारीचे दिवस आले. मराठी गझलेस वाहिलेली अनेक संकेतस्थले निर्माण झाली आणि मराठी कार्यशाळा उदयास आल्या. हा महाजालावरील मराठीच्या विकासाचा एक मोठा टप्पा ठरला आहे.[१८]
मराठी fonts
कंटेंट सॉफ्टवेअर
मजकुर व्यव्स्थापन प्रणाली कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर किंवा चि एम एस या नावाने सुद्धा ओळखली जाते. विवीध प्रकारची माहिती संबधीत उपयोगकर्त्यांना संकेतस्थळावर सोप्या स्वरूपात वापरता यावी हा मजकुर व्यव्स्थापन प्रणाली चा उद्देश्य असतो
ड्रूपल
ड्रूपलही मराठी चर्चात्मक संकेत स्थळांमध्ये मोठ्या प्रमाणात वपरली जाते.[१९] ड्रूपलचा उच्चार droo puhl असा करतात.एनट्रान्सएनट्रान्स ह्या देवनागरी टंकलेखनासाठी उपलब्ध पॅकेजमधील 'इंडिक वेब इनपुट' ह्या कार्यक्रमात 'फ्री जीएनयू लायसन्स' वापरून काही बदल करून टेक्स्टएरिया आणि टेक्स्टफ़िल्ड साठी ट्रॅन्ज़लिटरेशनची, लिप्यंतरणाची सोय देण्यात आली आहे. केवळ फोनेटिक कीबोर्ड ठेवण्यात आला आहे. . ड्रुपलशिवाय जूमला, टायपो किंवा अन्य सीएमससाठी देखील ही सुविधा किरकोळ बदल करून वापरता येते.[२०][२१][२२]
ड्रुपल व्यवस्थापन प्रणाली[२३]
मिडीयाविकि
तुम्ही मिडीयाविकि सॉफ्टवेअर स्वत:चे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता अथवा चक्क या सॉफ्टवेअरच्या डेव्हेलपमेंटमध्ये सहभाग घेऊ शकता.
मराठी संकेतस्थळांसमोरची आर्थिक मॉडेले आणि आव्हाने
मराठी संकेतस्थळांचे भविष्यातील स्वरूप
फाँट डाऊनलोड करावी लागणारी संकेतस्थळे
किरण भावे यांचे www.kiranfont.com या त्यांनी तयार केलेल्या संकेतस्थळावरून फाँट डाऊनलोड करता येतात.या फॉंटाच्या सहाय्यनेही काही मराठी तसेच संस्कृत भाषा, त्यातील विविध विषयांचे साहित्य यांचा परिचय करून देणारे गिर्वाणभारती (www. girvanbharati.com) हे संकेतस्थळ आहेत.
डायनॅमिक फाँट मधील संकेतस्थळे
युनिकोड मधील संकेतस्थळे
मराठी संकेतस्थळांचे युनिकोडीकरण
लोकप्रिय संकेतस्थळे
- हे मराठी भाषेतले लोकप्रिय संकेतस्थळ आहे.इथे "ऑर्कुट" च्या scrapbook प्रमाणे निरोप लिहिण्यासाठी "खरडवही" आहे. या संकेतस्थळावर सदस्यांसाठी वेगवेगळे समुदाय आहेत. आपल्या स्वारस्यानुसार सदस्य आपल्या आवडीच्या समुदायात सामील होऊ शकतात व विचारांच्या देवाणघेवाणीचा आनंद लुटू शकतात. "जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!" हे उपक्रमचे यथार्थ बोधवाक्य आहे.
- मराठी संकेतस्थळातील आणखी एक लोकप्रिय संकेतस्थळ आहे. मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ आहे. साहित्य लेखनाबरोबर, चर्चा, कौल, विचारांची देवाण-घेवाण करता येते. इथे ”खरडवही’’ व्यक्तिगत निरोप.त्याबरोबर येथे मराठीतून गप्पा करण्यासाठी ’खरडफळ्याची’ सुविधा दिलेली आहे.
- हे मराठी भाषेतील सुरेश भट यांच्या साहित्यासंबंधी संकेतस्थळ आहे
- हे मराठी भाषेतील गदिमांच्या साहित्यासंबंधी संकेतस्थळ आहे
महाराष्ट्र आणि मराठीविषयक पण मराठी भाषेत नसलेली संकेत स्थळे
- majhablog.in]]
- www.marathimovieworld.com
अनुदिनी
प्रत्येक व्यक्तीला व्यक्त व्हायचे असते. आणि ती इच्छा पूर्ण करतात ते ब्लॉग. आपल्याला पटणार नाही आज मराठीत वेगवेगळया विषयांवरचे जवळजवळ 1३00 ब्लॉग आहेत. अगदी प्रत्येक व्यक्ती मग ते राजू परूळेकर असोत वा माझ्यासारख्या सामान्य सगळेच ब्लॉगद्वारे व्यक्त होत आहेत. आणि हे सर्व ब्लॉग तुम्ही मराठी ब्लॉगविश्व (www.marathiblogs.net) वर एकत्र पाहू शकता.
महाराष्ट्र मंडळांच्या संकेत स्थळांचे कार्य
याहू एम्एस्एन इत्यादी ग्रुप्सचे मराठी व महाराष्ट्राकरिता योगदान
ऑनलाईन मराठी ग्रूप्स(याहू,गूगल,एमेसेन) आणि (आर्कूट,फेस्बूक इत्यादी वरील)तसेच (बॅचमेट डॉटकॉम इत्यादी) कम्यूनिटीजच्या निर्मीती(evolution) व सामाजिक योगदानाबद्दल लिहा केवळ दुवे नका देऊ! धन्यवाद.
पुरस्कारप्राप्त संकेतस्थळे
शैक्षणिक संकेतस्थळे
http://marathishabda.com/moodle
साहित्यविश्वाला वाहिलेली संकेतस्थळे
मराठी ग्रंथ
[www.marathipustake.com]
मराठी वृत्तपत्रे
लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो तो पत्रकारिता. आज जवळजवळ 15 मराठी वृत्तपत्रांच्या ई - आवृत्या आहेत.( पहा http://batmidar2.blogspot.com/ मराठी व्रुत्त्पत्रे विभाग)विविध वृत्तपत्रांची सतत अपडेट होणारी स्थळे आहेत. नुकतेच 'ई - सकाळ' ने (www.esakal.com) नवे रूप धारण केले आहे. जेथे वाचकानांही व्यक्त होण्याची जागा आहे व या स्थळांना दिवसाला लाखो व्यक्ती भेट देत आहेत. याशिवाय दोन वृत्तवाहिन्या संस्थळावर उप्लब्ध आहेत. फक्त नेटवर असणारे एक चॅनेलदेखील आहे. (www.nautankitv.com) याशिवाय कळते - समजते (www/batamidar2.blogspot.com) द्वारे ई - पत्रकारिकताही केली जाते. तर बातमीदार(www.batamidar.blogspot.com) सारखे संस्थळ पत्रकारांवर सतत नजर ठेवून असते.
- batmya.com ऑनलाईन मराठी बातम्या
- सकाळ
- दैनिक लोकमत
- लोकसत्ता
- महाराष्ट्र टाइम्स
- सामना
- दैनिक पुढारी
- तरुण भारत
मराठी साप्ताहिके व मासिके
शासकीय संकेतस्थळे
महाराष्ट्राचे अधिकृत संकेतस्थळ (www.maharashtra.gov.in) संपूर्णपणे मराठीत असून येथे आपण आपल्या भाषेत कोणतीही माहिती मिळवू शकतो. याशिवाय सतत अपडेट राहणारे (www.mahanews.gov.in) हे संकेतस्थळ अतिउत्तम आहे. याशिवाय जवळजवळ सर्व जिल्हयांची आणि महापालिकांची अतिउत्तम संकेतस्थळे आहेत. महाराष्ट्र ख-या अर्थाने ई - गव्हर्नन्स मध्ये पुढारलेलं आहे. हे यावरून स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक दस्त ऐवजाचे महत्व असलेली गॅझेटियर्स सुद्धा शासकिय संकेतस्थळांवर ऊपलब्ध आहेत.
| शासकीय खाते | संकेतस्थळ |
| 3 | 4 |
शैक्षणिक संकेतस्थळे
| शैक्षणिक संस्था/विभाग | संकेतस्थळ |
| 3 | 4 |
मराठी वेबमास्टर्स
विजय चाळके vijay@avishkarsolutions.com
Vijay Kudal
काही उपयुक्त संकेतस्थळे
- कानोकानी.कॉम :मराठीतलं लोकप्रिय ते तुम्हाला हवं,कानोकानीनं तुमच्यापर्यंत ते पोहोचवावं ||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- गुगल मराठीजगत शोध - मराठी व इतर देवनागरी भाषांसाठी (युनिकोड) शोधयंत्र||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
[६]||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठीमाती डॉट कॉम||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- Marathi Maya - Marathi Movies, Theatre, TV, Songs, Lyrics... ||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी पत्रकारांसाठी उपयुक्त वेबलॉग||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी छोट्या जाहिराती||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मनोगत||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- अनामिका मराठी वाचनालय़... ग्रंथालय||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मायबोली||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठीवर्ल्ड||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी शब्दबंध||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- गुगल मराठी शोध||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी ब्लॉग्स||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी मित्र मराठी शिकण्यासाठी||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी पुस्तके||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी इंग्रजी शब्दकोश||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी जगत >> इथे मराठीचिये नगरी...||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी समुदाय||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- समग्र चिंटू संग्रह (Collection of Chintoo (Chintu) cartoon strips)||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
- मराठी शब्द||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
मराठी भाषेतील मुक्त शब्दभांडार - http://thebhandarkars.com/shabdabhandar/index.php?title=Main_Page||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://saanjavel.blogspot.com/||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास http://www.marathionline.com/||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://mr.wikipedia.org/wiki/Main_Page ||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. 'विकिपीडिया' हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. ही त्याची मराठी आवृत्ती आपण घडवू शकता. मराठी भाषेत 'विकिपीडिया' संकलित करण्यास हातभार लावा. 'विकिपीडिया'मध्ये लेखांची भर घालण्यासाठी (संकलित/संपादित करण्यासाठी) मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. तसेच मराठीचा संगणकीय वापर करण्यासाठीदेखील हा लेख उपयोगी आहे. सध्या 'विकिपीडिया'मध्ये लेखांची एकूण संख्या 136 आहे. मराठीभाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल.
http://maayboli.com/||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
हे 'मनोगत'प्रमाणेच परंतु किंचित निराळे आहे. ह्यात काही पूर्वनियोजित असे कप्पे असतात. त्यात तुम्ही तुमचे लिखाण लिहू शकता.
http://marathiworld.com||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://www.mazikavita.com/main.html||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
माझी कविता
सदर संकेतस्थळावर चंद्रशेखर गोखले, गिरीश ओक, निशिगंधा वाड आदींच्या मोजक्याच कविता उपलब्ध आहेत.
पुलदेशपांडे . नेट
इथे पुलं च्या बहुरूपी व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवणारे अनेक दुवे आहेत. flash मधील एक "बहुरूपी पुलं"ही. त्यांची अनेक छायाचित्रे, काही पत्रे, काही कविता, लेख, चाहत्यांची पत्रे, हस्ताक्षर इत्यादीही इथे उपलब्ध आहे.
सदर संकेतस्थळास आजवर ३ वर्षात साधारणपणे ८० हजार वेळा भेट दिली गेली आहे..... अर्थात पुन्हा पुन्हा भेट देण्याजोगे आहे.
पुलदेशपांडे . नेट http://www.puladeshpande.net/||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
खगोलशास्त्रावरील मराठीतून माहिती देणारे संकेतस्थळ अवकाशवेध. यावर आपली सूर्यमाला, ग्रह, तारे व नक्षत्रांबद्दल माहिती उपलब्ध आहे.
तसेच काही चित्रे, या महिन्याचे आकाश इत्यादी माहिती आहे
http://www.avakashvedh.com||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://n.1asphost.com/puladeshpande/AntuBarva.html अंतु बर्वा||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
या दुव्यावर काही मराठी पुस्तके online आहेत. http://www.rasik.com/marathi/index.html||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
जर खरेदी करावीशी वाटली तर येथे पुस्तके विकत मिळतात.
(या संकेतस्थळाचा मी फक्त वाचक आहे. त्याव्यतिरिक्त माझा त्यांच्याशी काही संबंध नाही).
रसिकपुस्तके संकेतस्थळ आहे तर छान; पण या स्थळावरचा मजकूर युनिकोडित नसल्यामुळे ह्या स्थळाचा गूगल, याहू इ. सारख्या सर्वसाधारण शोधसाधनांद्वारे शोध करता येत नाही. म्हणून एखाद्या पुस्तकाबद्दल जर माहिती काढायची असली किंवा विकत घ्यायचे असले तर पानेच्या पाने शोधत बसावी लागतात. जर हे संकेतस्थळ युनिकोडित करण्यात आलं तर किती फ़ायदा होईल, ग्राहकांचा तर होईलच, पण त्यामुळे अधिक पुस्तके विकली गेल्यामुळे रसिकपुस्तकेवाल्यांचादेखील. मनोगत युनिकोडित असल्याचा हाच तर मुख्य फ़ायदा मला जाणवतो. उदा.जर कोणाला पोहे बनवण्याची पाकक्रिया हवी असली तर फक्त गूगलवर 'पोहे' हा शब्द शोधण्याची गरज आहे.. हा शोध त्यांना सरळ मनोगतवरच्या रोहिणीच्या पोहे बनवण्याची पाककृती लिहिलेल्या पानावर नेऊन सोडतो.... खरं तर मराठी बातमीपत्राच्या संकेतस्थळांनीसुद्धा युनिकोडचा वापर केला तर आपण बातम्यादेखील गूगलवर सरळ मराठीत शोधू शकू..[७]
http://www.cfilt.iitb.ac.in/marathi_Corpus/ ही काही उपयुक्त मराठी लेख/पुस्तके आहेत. याही दुव्याची माहिती मनोगतावर इतरत्र मिळाली.. ||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
या ही संकेतस्थळाची माहिती मनोगतानेच दिली (?) इथे मराठीसह अनेक भारतीय भाषांचे विशाल शब्दकोश उनिकोडमधे उपलब्ध आहेत.
http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
तात्पूरती यादी
| बाह्यदुवा नाव | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| माझा ब्लॉग | अनुदिनी | |
| shatatarakaa.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| मी माझाhttp://www.meemaza.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| महाराष्ट्र सरकारचे संकेतस्थळhttp://www.maharashtra.gov.in/marathi/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| शततारका | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://sanskrit.gde.to/marathi/shatataarakaa/||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| अरविंदगुप्ताटॉइज.कॉम ह्या संकेतस्थळावर मराठी/हिंदीत अनुवादित केलेली काही पुस्तके आहेत. खेळण्यांच्या विभागात सहज बनवता येतील अशी खेळणीही आहेत. | ||
| http://www.aathavanitli-gani.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.apalepl.tk/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.marathimaya.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.archanajoglekar.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.dilipprabhawalkar.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.kalamanch.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.kedarshinde.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.kanokani.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.natak.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.marathimati.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.marathimitra.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.Marathiworld.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.marathishabda.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.meemaza.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.mumbai-masala.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.mymarathi.org/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.Aathavanitli-Gani.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.zeetelevision.com/newzee/alpha-marathi.htm | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.gadima.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.kalamanch.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.kedarshinde.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.natak.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.prashantdamle.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.dailykesari.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.dainikaikya.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.deshdoot.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.deshonnati.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.lokmat.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.loksatta.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.maharashtratimes.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.pudhari.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.saamana.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.esakal.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.tarunbharat.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.avakashvedh.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.bhatkanti-maharashtra.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.bhawishya.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.chintoo.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.ekata.ca/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.maayboli.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.bmmonline.org/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.maharashtrians.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.manacheshlok.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.manogat.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.rss.org | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.bhimashankar.blessingsonthenet.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://www.dattamandirpune.com/||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.ramdas.org | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.satpudamanudevi.org | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.shanishinganapur.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.SwamiSamarth.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास
http://www.siddhivinayak.org/siddhivinayaknew/index1.htm||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास http://www.shrisaibabasansthan.org||वर्गीकरण||विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.tukaram.com | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http:http://www.prashantdamle.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| puladeshpande.net/index.php | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.geocities.com/marathi_poem/index.html | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.ramrampavna.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.aarogya.com/marathi/index.asp | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.amhimarathi.com/home.html | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.girvanabharati.com/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.geocities.com/gaanni5/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| http://www.geetsargam.net/bhav_geete/ | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
| गीतमंजुषा]] या संकेतस्थळावर शेकडो मराठी गाण्यांचे बोल गायक, संगीतकार व | ||
| गीतकारानुसार मिळतात. | वर्गीकरण | विशेष/मराठी विकिपीडियातील लेखदुवा असल्यास |
ऐक्य, केसरी, तरूण भारत, देशोन्नती, देशदूत, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, सामना.
| header 1 | header 2 | header 3 |
|---|---|---|
| row 1, cell 1 | row 1, cell 2 | row 1, cell 3 |
| row 2, cell 1 | row 2, cell 2 | row 2, cell 3 |
हे सुद्धा पहा
संदर्भ व नोंदी
- ↑ The website of the world's first-ever web server".Retrieved on 2008-08-30.
- ↑ Cailliau, Robert. "A Little History of the World Wide Web". Retrieved on 2007-02-16.
- ↑ *[snapshot of the page as it appeared on 23 Feb 2009 01:40:19 GMT गूगल स्नॅपशॉट http://72.14.235.132/search?q=cache:1tDW3gTZfCoJ:loksatta.com/daily/20040627/rvvru06.htm+%22%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87%22&cd=19&hl=en&ct=clnk&gl=in आंतरजाल संदर्भ १५ एप्रील २००९]
- ↑ [१]
- ↑ महाजालावरील मराठीचा इतिहास-१-नरेन्द्र गोळे
- ↑ महाजालावरील मराठीचा इतिहास-१-नरेन्द्र गोळे
- ↑ मायबोली वरील ऋणनिर्देश जसा १९ जून २००९ ला १२.१० दुपारी दिसला.
- ↑ मायबोली वरील ऋणनिर्देश जसा १९ जून २००९ ला १२.१० दुपारी दिसला.
- ↑ मायबोली वरील ऋणनिर्देश जसा १९ जून २००९ ला १२.१० दुपारी दिसला.
- ↑ This is Google's cache of http://www.misalpav.com/node/96. It is a snapshot of the page as it appeared on 29 Mar 2009 10:25:47 GMT. The current page could have changed in the meantime.
- ↑ This is Google's cache of http://www.misalpav.com/node/96. It is a snapshot of the page as it appeared on 29 Mar 2009 10:25:47 GMT. The current page could have changed in the meantime.
- ↑ This is Google's cache of http://www.misalpav.com/node/96. It is a snapshot of the page as it appeared on 29 Mar 2009 10:25:47 GMT. The current page could have changed in the meantime.
- ↑ This is Google's cache of http://www.misalpav.com/node/96. It is a snapshot of the page as it appeared on 29 Mar 2009 10:25:47 GMT. The current page could have changed in the meantime.
- ↑ *[snapshot of the page as it appeared on 23 Feb 2009 01:40:19 GMT गूगल स्नॅपशॉट http://72.14.235.132/search?q=cache:1tDW3gTZfCoJ:loksatta.com/daily/20040627/rvvru06.htm+%22%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87%22&cd=19&hl=en&ct=clnk&gl=in आंतरजाल संदर्भ १५ एप्रील २००९]
- ↑ मिसळपाव संकेतस्थळावरील विनायक वा.पाचलग यांचा लेख
- ↑ जितेनचा प्रतिसाद
- ↑ लोकायतवरमोबाईलवर मराठी संकेतस्थळेचर्चा १९ जून २००९ १ वाजून ४२ मिनीटांनी दिसली त्याप्रमाणे
- ↑ [http://www.manogat.com/node/16820 महाजालावरील मराठीचा इतिहास-२ -नरेन्द्र गोळे
- ↑ http://www.drupal.in/
- ↑ मायबोली प्रणाली
- ↑ गमभन
- ↑ http://www.manogat.com/node/8141
- ↑ http://mr.upakram.org/node/852