मराठी विज्ञान परिषद
| हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा. |
मराठी विज्ञान परिषदेची स्थापना इ.स. १९६६ साली झाली. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा समृद्ध करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून कार्य करीत असलेल्या या संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत चुनाभट्टी येथे आहे. मध्यवर्तीशी संस्थेशी संलग्न विभागांशी संख्या एकूण ६८ इतकी आहे. हे सर्व विभाग महाराष्ट्रभर विखुरले असून महाराष्ट्राबाहेरही परिषदेचे ४ विभाग कार्यरत आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] कार्य
वार्षिक संमेलने, विविध विषयावरील व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे, विद्यार्थ्यांसाठीचे प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारे विविध उपक्रम, दृकश्राव्य कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रसार, प्रासंगिक विषयावर जागरुकता, याचबरोबर विविध स्पर्धा घेऊन पुरस्कार / पारितोषिके देणे, स्वतंत्र विज्ञान मासिक, वेगवेगळ्या विषयावरील पुस्तिकांचे प्रकाशन असे उपक्रम परिषदेतर्फे पार पाडले जातात. मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्षपद इ.स. २००० सालापासून श्री. प्रभाकर देवधर (माजी अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक आयोग, भारत सरकार) हे सांभाळीत आहेत. आतापर्यंत हे पद डॉ.रा.वि.साठे (१९६६-७६), श्री.म.ना.गोगटे (१९७६-८२), प्रा.भा.मा.उदगांवकर (१९८२-९१), प्रा.जयंत नारळीकर (१९९१-९४), डॉ.वसंत गोवारीकर (१९९९४-२०००) या मान्यवर शास्त्रज्ञ/वैज्ञानिकांनी भूषवले आहे.
मराठी विज्ञान परिषदेला विज्ञान तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार तसेच फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेलाही आतापर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा संस्थांकडून विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
[संपादन] 'परिषदेचे विभाग
[संपादन] मुंबई व कोकणः
१) ईशान्य मुंबई, २) ठाणे, ३) डोंबिवली, ४) अंबरनाथ, ५) चिंचणी-तारापूर, ६) बोर्डी, ७) रोहा, ८) रत्नागिरी, ९) नारिंग्रे
[संपादन] पश्चिम महाराष्ट्रः
१) लोणावळा, २) तळेगाव, ३) पुणे, ४) बारामती, ५) अहमदनगर, ६) कराड, ७) राजारामनगर, ८) सांगली, ९) कोल्हापूर, १०) गडहिंग्लज, ११) आजरा, १२) चंदगड, १३) बिद्री, १४) बार्शी, १५) सोलापूर
[संपादन] उत्तर महाराष्ट्रः
१) धुळे, २) चाळिसगाव, ३) नंदुरबार, ४) खांडबारा, ५) साक्री, ६) नाशिक
[संपादन] मराठवाडाः
१) औरंगाबाद, २) जालना, ३) उदगीर, ४) उमरगा, ५) नांदेड, ६) किनवट, ७) बीड, ८) हिंगोली, ९) उस्मानाबाद, १०) नळदुर्ग, ११) उमरी, १२) माजलगांव
[संपादन] विदर्भः
१) नागपूर, २) वरोरा, ३) वणी, ४) अमरावती, ५) गडचिरोली, ६) अहेरी, ७) नवरगाव, ८) वाशिम, ९) अकोला, १०) मुर्तिजापूर, ११) बुलढाणा, १२) पारस, १३) पुसद, १४) उमरखेड, १५) भंडारा, १६) वडसा, १७) चंद्रपूर, १८) आर्वी, १९) आरमोरी, २०) मानोरा, २१) मालेगांव, २२) गोंदिया
[संपादन] महाराष्ट्राबाहेरः
१) वडोदरा, २) गोवा, ३) बेळगाव, ४) भोपाळ