मराठी ख्रिश्चन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी ख्रिश्चन किंवा ख्रिस्ती लोक् हा ख्रिश्चन धर्म आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक मराठी मातृभाषा म्हणून बोलतात. या समाजात इंग्लिशही संभाषणसाठी वापरतात. महाराष्ट्रात ख्रिस्ती हे प्रामुख्याने दोन समाजात आढळतात एक् इस्ट इंडियन ख्रिश्चन हे मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमधले मूलनिवासी आहेत, व दुसरे, मराठी ख्रिस्ती म्हणुन् ओऴखले जातात्. महाराष्ट्रात मराठी ख्रिश्चन हे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, अहमदनगर, सोलापूर, पुणे आणि ,नाशिक, औरंगाबाद् मध्ये आढळतात. महाराष्ठ्रात ख्रिस्ती लोकांची लोकसंख्या फक्त २.० % आहे.

अहमदनगर[संपादन]

रोमन कॅथलिक पंथीयांची संख्या महाराष्ट्रात अधिक असली, तरीही मराठी ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथाचे अनुयायी आहेत ते अहमदनगर, सोलापूर येथे लक्षणीय संख्येने आढळतात. अहमदनगरात पहिले चर्च मिरी, पाथर्डी तालुक्यात इंग्रजांनी इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात बांधले होते. अहमदनगरात सगळ्या गावात ख्रिस्ती लोकांचे स्वतःचे प्रार्थनेचे चर्च आहेत. अहमदनगरात, सोलापुरात ख्रिस्ती हे अमेरिकन मराठी मिशनमिशन ऑफ् द चर्च ऑफ् इंग्लड यांच्या कार्यामुळे आढळतात. महाराष्ठ्रात बहुतेक प्रोटेस्टंट् हे चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ह्या संप्रदायातले आहेत.

श्रद्धा[संपादन]

हरेगाव ह्या श्रीरामपूर तालुकयातील गावी मतमाउलीची जत्रा दरवर्षी भरते. लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू या जत्रेसाठी येतात. ही जत्रा दरवर्षी ७ आणि ८ सप्टेंबरास असते. हरेगावाला मराठी कॅथलिकांचे पंढरपूर अशी उपमा दिली जाते. या जत्रेला अहमदनगर, नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातून लोक येतात. काही लोक तेथे नवस करायाला येतात आणि त्यांची नवस, मागण्या पूर्णही होतात, अशी श्रद्धा आहे. ही जत्रा मतमाउलीच्या जन्मदिवसाच्या वेळी असते. ही जत्रा एका ख्रिस्ती धर्मगुरूने इ.स. १९४९ साली सुरू केली, कारण बहुतेक लोक वांद्रे येथील जत्रेला जाऊ शकत नव्हते. त्यांच्या सुविधेसाठी त्यांनी ही जत्रा सुरू केली.

वडुले अहमदनगर चर्च

इतिहास[संपादन]