भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

स्वतंत्र भारत गणराज्यास स्वतःची दिनदर्शिका असावी या हेतूने स्थापित करण्यात आलेल्या भारतीय शास्त्रज्ञांच्या एका समितीने केलेली दिनदर्शिका भारताची अधिकृत दिनदर्शिका म्हणून इ.स. १९५७ पासून स्वीकारण्यात आली.

ही दिनदर्शिका सौर दिनदर्शिका आहे. तिची सुरवात ग्रेगरीयन दिनदर्शिकेतील २१ मार्च या दिवशी (तिच्या स्वतःच्या लीप वर्षात २२ मार्च रोजी)होते. हिंदू कालगणनेतील महिन्यांची नावेच या दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. ते वगळता तिच्याशी या दिनदर्शिकेचे काहीही साधर्म्य नाही.