भाऊसाहेब हिरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाऊसाहेब हिरे (इ.स.चे २० वे शतक) हे मराठी समाजसुधारक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. ते निवडणुकांमध्ये मालेगाव किंवा दाभाडी मतदारसंघातुन निवडून गेले. भाऊसाहेब हिरे यांनी महाराष्ट्र शासनात अनेक मंत्रिपदे भूषविली.[ संदर्भ हवा ] भाऊसाहेब हिरे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अतिशय मोलाचे योगदान आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्यांना सहकार महर्षी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील क्रांतिकारी कूळ कायद्याचे ते जनक होते. महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते जनक होते.[ संदर्भ हवा ]