ब्रिटिश सोमालीलँड
|
ब्रिटीश सोमालीलँड
धूल्का ब्रिटिशका ई सोमालिया الصومال البريطاني |
||||||
|
||||||
|
||||||
| राजधानी | हारगेइसा | |||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश, सोमाली | |||||
| राष्ट्रीय चलन | इस्ट आफ्रिकन शिल्लिंग्ज | |||||
ब्रिटिश सोमालीलँड (सोमाली: Dhulka Biritishka ee Soomaaliya ; अरबी: الصومال البريطاني , अल-सुमाल अल-ब्रितानीय; इंग्लिश: British Somaliland) हे वर्तमान सोमालियाच्या उत्तरेकडील भूप्रदेश व्यापणारे ब्रिटिश संरक्षित राज्य होते. हे इ.स. १८८४ ते इ.स. १९६० या कालखंडात अस्तित्वात होते. अस्तित्वकाळातल्या बह्वंशी कालखंडात हे राज्य फ्रेंच सोमालीलँड, इथिओपिया व इटालियन सोमालीलँड या राज्यांनी वेढला होता. इ.स. १९४०-४१ या कालावधीत इटालियनांनी यावर कब्जा मिळवून आपल्या इटालियन पूर्व आफ्रिका या वसाहतीस जोडला. १ जुलै, इ.स. १९६० रोजी हे संरक्षित राज्य स्वतंत्र होऊन अल्पावधीसाठी सोमालीलँडचे राज्य या नावाने अस्तित्वात आले. त्यानंतर आठवड्याभरातच सोमालीलँडच्या राज्याचे सोमालियाच्या विश्वस्त राज्याशी (भूतपूर्व इटालियन सोमालीलँड) एकत्रीकरण करून सोमाली प्रजासत्ताक स्थापण्यात आले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |