ब्रिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कृपया, हा साचा लावताना कारण नमुद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सुचीत केले जावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

कारण कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

या लेखातील मजकूर् ब्रिक्‍स‎ येथे आहे.

जगाच्या नकाशावर ब्रिक्स

ब्रिक्स BRICS (बी. आर. आय. सी. एस.) हा संक्षेपार्थाचा शब्द ब्राझिल, रशिया, भारत, चीनदक्षिण आफ्रिका ह्या झपाट्याने प्रगती करणार्‍या विकसनशील देशांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. अमेरिकन बँक गोल्डमन सॅक्सने २००१ साली ह्या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली.
२०१० पर्यंत या संघटनेचे नाव "ब्रिक" होते. २०१० साली दक्षिण आफ्रिकेच्या आगमनानंतर या संघटनेचे नाव ब्रिक्स करण्यात आले.

[संपादन] ब्रिकचे जगातील स्थान

मुद्दे ब्राझिल ध्वज ब्राझिल रशिया ध्वज रशिया भारत ध्वज भारत Flag of the People's Republic of China चीन दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
क्षेत्रफळ ३ / ४ (वादातीत) २५
लोकसंख्या २४
दरडोई उत्पन्न (२०१०) (आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार) ११ २९
दरडोई उत्पन्न (PPP) (२०११) (आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार) २५
निर्यात (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीनुसार) १८ १४ ३७
आयात (जागतिक व्यापार संघटनेनुसार) १९ १७ ११ ३४
विदेशी गुंतवणूक १६ १२ २९
परकीय चलन गंगाजळी
विदेशी कर्ज २५ २० २९ २२
सार्वजनिक कर्ज ४७ ११७ २९ ९८
विजवापर १०
मोबाईल फोन्सची संख्या
इंटरनेटचा वापर ११

[संपादन] ब्रिक्स परिषद

परिषद क्र. सहभागी देश दिनांक यजमान देश यजमान ठिकाण
ब्रिक १६ जून २००९ रशिया दिमित्री मेदवेदेव येकातेरिनबर्ग
ब्रिक १६ एप्रिल २०१० ब्राझिल लुईझ इनाचिओ लुला दा सिल्व्हा ब्राझिलिया
ब्रिक्स १४ एप्रिल २०११ चीन हू चिंताओ सान्या
ब्रिक्स २९ मार्च २०१२ भारत मनमोहनसिंग नवी दिल्ली
ब्रिक्स २०१३ दक्षिण आफ्रिका जेकब झुमा -


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

गोल्डमन सॅकच्या प्रमेयानुसार ब्रिकमधली प्रगतीपथावर असणारी चारही राष्ट्रे २०५० सालापर्यंत एवढी प्रचंड प्रगती करतील की ब्रिक नुसताच आजच्या प्रगत राष्ट्रांच्या पंगतीला जाऊन बसणार नाही तर तो त्यांच्याहूनही अधिक प्रगती करील. २००४ साली आणि २००७ साली गोल्डमन सॅकच्या अर्थतज्ज्ञांनी आपल्या प्रमेयाचं पुन:परीक्षण करून ब्रिकमधल्या चीन आणि भारत यांच्या प्रगतीच्या दराचा आढावा घेऊन आपले आधीचे अंदाज बदलले व भारताची अर्थव्यवस्था २०४७ साली अमेरिकन अर्थव्यवस्थेला मागे टाकेल तसंच ब्रिक हा राष्ट्रसमूह जी-७ या प्रगत राष्ट्रसमूहाला २०३२ साली मागे टाकील, अशी भविष्यवाणी केलीय. जगावर आलेल्या मंदीच्या आर्थिक संकटाची समीक्षा केल्यानंतर गोल्डमन सॅक आपल्या प्रमेयाची पुन:श्च पृष्ठी करताना म्हणते, या आर्थिक संकटामुळे चीन आणि भारत अधिक सक्षम होतील आणि ब्रिक राष्ट्रसमूह जी-६ या प्रगत राष्ट्रसमूहाला २०२० सालीच मागे टाकेल. चीन २०२७ साली जगातली आर्थिक महासत्ता म्हणून पहिल्या क्रमांकावर असेल. गोल्डमन सॅकच्या भविष्यवाणीनुसार जगाची अर्थव्यवस्था १.१ टक्क्याने घसरेल तर ब्रिक राष्ट्रसमूहाच्या अर्थव्यवस्था ४.८ टक्क्याने विकसित होतील.

ब्रिक राष्ट्र समूहाविषयी

वास्तविक गोल्डमन सॅकने ब्रिकच्या चार राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा वेगवेगळा आणि एकत्रित संशोधन- अभ्यास करून आपलं प्रमेय मांडलं आणि वेळोवेळी त्याची समीक्षा करून त्यात सुधारणा केली. गोल्डमन सॅकने या चार राष्ट्रांनी काय करावं हे कधीच सुचवलं नाही वा त्यावर भाष्यपण केले नाही. परिणामत: जसजशी प्रमेयाची पकड घट्ट होत गेली तसतशी चार राष्ट्रं परस्परांजवळ येत गेली. अजूनही ब्रिक हा अनौपचारिक राष्ट्रसमूहच आहे. २००८ साली चार राष्ट्रांचे परदेशमंत्री प्रथम एकत्र आले. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर ब्रिकला अधिक जवळ येण्याची निकड वाटली नि म्हणून १६ जून २००९ रोजी चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एडातरीनबर्ग येथे संपन्न झाली. विशेष गोष्ट अशी की, ब्रिकची चारही राष्ट्रं जी-२० या प्रगत नि प्रगतीपथावर असणाऱ्या राष्ट्रांच्या अनौपचारिक राष्ट्रसमूहाचे सदस्य आहेत. जी-२० या राष्ट्रसमूहांत ब्रिकचा आवाज बुलंद झाला. पहिल्या शिखर परिषदेत चीन आणि भारत यांनी जगाच्या अर्थमंचावर असलेलं ब्रिकचं स्थान त्याला मिळालंच पाहिजे या दिशेने वाटचाल केलीय. जगाच्या भूमीच्या जवळपास एक चतुर्थाश भूमी ब्रिकच्या राष्ट्रसमूहाने व्यापली आहे. तसंच जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या ब्रिक राष्ट्रसमूहाची आहे. जगाच्या जी.डी.पी.च्या ४० टक्के जी.डी.पी. ब्रिक राष्ट्रसमूहाचा आहे. याचा साकल्याने विचार करून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या चार राष्ट्रांनी परस्परांतलं सहकार्य नि संघटन वाढविण्यावर भर दिला.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये