ब्राह्मण (जात)
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
| या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
ब्राह्मण हा हिंदू समाजातील चतुर्वर्णातील एक वर्ण किंवा जात आहे. पूर्वी ज्या लोकांनी धार्मिक ग्रंथ आणि वेदांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान ग्रहण केले अशा लोकांना ब्राह्मण ही उपाधी दिली जात असे. त्यावेळी ब्राह्मण बनण्यासाठी कोणावरही बंदी नव्हती फक्त धर्मोपदेशक म्हणून त्यांना स्वत:चे कर्तृत्व दाखवावे लागे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
ब्राह्मणांचा इतिहास प्राचीन काळतील वैदिक धर्मापासून सुरू होतो. मनुस्मृतीमध्ये आर्यावर्त हे वैदिक लोकांचे स्थान होते अशी नोंद आहे. ब्राह्मणांच्या दिनचर्येचे वेद हे प्राथमिक स्रोत आहेत. ब्राह्मणांतील सर्व संप्रदाय वेदांपासून प्रेरणा घेतात. असे मानण्यात येते की वेद हे अपौरुषेय आणि अनादि असून ते अंतिम सत्यांवर प्रकाश टाकतात. वेदांना श्रुती असे संबोधले जाते कारण परंपरेनुसार पाठांतराने वेद जतन केले गेले. श्रुतींमध्ये चार वेदांशिवाय ब्राह्मणनामक ग्रंथही आहेत.
[संपादन] गोत्रे आणि प्रवरे
गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत.बौधायनसूत्रानुसार विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.
गोत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, पराशर, कुंदिन आणि वसिष्ठ(पहिल्या तीनमध्ये नसलेले). या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे वसिष्ठ, भारद्वसू व इंद्रप्रमाद; पराशर गोत्रातील प्रवरे वसिष्ठ, शाक्त्य व पाराशर्य; कुंदिना गोत्राची वसिष्ठ, मैत्रात्रवरुण व कौंडिण्य ही होत.
प्रवरे दोन प्रकारची असतात: १> शिष्य-प्रशिष्य-ऋषी-परंपरा आणि २> पुत्रपरंपरा.
[संपादन] ऋषी आणि पंथ
धर्म, सांस्कृतिक परंपरा, आचार व वैदिक विचार यांच्यातील विविधतेमुळे ब्राह्मणांच्यात पुन्हा पोटजाती निर्माण झाल्या. वेदकाळातील ब्राह्मण वेगवेगळ्या वेदाच्या शिकवणीनुसार वेगळे झाले. एकाच शाखेतील विद्वान ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली विविध पंथ निर्माण झाले. या विद्वान ऋषींनी दिलेल्या शिकवणीला सूत्रे असे म्हणतात. प्रत्येक वेदाची स्वतःची सूत्रे आहेत. सामाजिक, नैतिक व कायदे यांच्या सूत्रांना धर्मसूत्रे, विविध धार्मिक विधींच्या सूत्रांना श्रौतसूत्रे तर घरगुती विधींशी संबंधित सूत्रांना गृह्यसूत्रे असे म्हणतात.
अनेक ब्राह्मणांनी विविध नियम तयार केले. उदा: अंगिरस, आपस्तंब, अत्रि, बृहस्पती, बौधायन, दक्ष, गौतम, हरित, कात्यायन, लिखित, मनू, पराशर, संवर्त, शंख, शतताप, उषानस्, वसिष्ठ, विष्णू, व्यास, याज्ञवल्क्य आणि यम. या २१ ऋषींनी स्मृतींची सुरुवात केली. यातील आपस्तंब, बौधायन, गौतम आणि वसिष्ठ यांच्या स्मृती सर्वांत जुन्या आहेत.
[संपादन] ब्राह्मणाची कर्तव्ये
यास्काच्या निरुक्तात म्हटले आहे की "ब्रह्मम् जानति इति ब्राह्मणम्". म्हणजेच ज्याला अंतिम सत्य माहिती आहे तो म्हणजे ब्राह्मण. परंपरेनुसार ब्राह्मण हिंदू समाजातील पुजारी आणि पंडित म्हणून काम करत आले आहेत. आज मात्र ब्राह्मण विविध क्षेत्रात गुंतलेले दिसतात व त्यांची धार्मिक परंपरा आणि संस्कृती ही दैनंदिन जीवनात फार कमी प्रमाणात वापरली जाते.
खालील श्लोकात ब्राह्मणांची सहा कर्तव्ये दिली आहेत.
अध्यापनं अध्यययनम् यज्ञम् याज्ञम् तथा दानम् प्रतिग्रहम् चैव ब्राह्मणानामकल्पयात्
शिकणे, शिकवणे, यज्ञयाग करणे, करवून घेणे, दान घेणे व दान देणे ही ब्राह्मणांची सहा कर्तव्ये आहेत.
[संपादन] ब्राह्मण समाज
[संपादन] सध्याच्या समाजातील ब्राह्मणांचे स्थान
[संपादन] संदर्भ
[संपादन] हेसुद्धा पाहा
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |