ब्रह्मगिरी किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रह्मगिरी किल्ला
नाव ब्रह्मगिरी किल्ला
उंची १२९४ मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण त्र्यंबकेश्वर
जवळचे गाव
डोंगररांग त्र्यंबकेश्वराची
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {{{स्थापना}}}


ब्रह्मगिरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे. उंची समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर / ४२४६ फ़ूट.

मार्ग[संपादन]

त्र्यंबकेश्वरापासून गंगावर्तकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या सुरू होतात, त्या पायऱ्यांनी वर चढताना पंधरा मिनिटानंतर डावीकडे ब्रह्मगिरीला जाणारी वाट दिसते. या ठिकाणी दिशादर्शक फलकही आहे. साधारणतः वीस मिनिटे चालल्यावर त्र्यंबकेश्वराच्या कुशावर्ताकडून येणाऱ्या बांधीव पायऱ्यांपाशी आपण पोहोचतो. त्यांवरून चढत चढत कड्यापाशी पोहोचायचे. तिथून कड्यावर चढण्यासाठी खोदलेल्या पायऱ्यांनी सुमारे दीड तासात ब्रह्मगिरीगडावर पोहोचता येते.

इतिहास[संपादन]

या किल्ल्याचा उल्लेख यादव काळापासून झालेला आढळतो. सम्राट रामचंद्रदेव यादव यांनी हा किल्ला जिंकला होता. पुढे इ.स. १६२९ मध्ये शहाजीराजांनी जिंकला. पुढे इ.स. १६७० मध्ये सातमाळा रांगेतील कांचनाच्या खिंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाउद खानाचा पराभव केला आणि या संपूर्ण भागावर वचक बसवला. त्याच वर्षी मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला आणि परिसर मराठी राज्यात सामील करून घेतला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी सर्व मराठी मुलुख घेताना हा किल्ला सुद्धा घेतला.

गडावरील परिसर[संपादन]

गडावर फारशी सपाटी नाही. उजवीकडे चढून गेल्यावर 'गोदातीर्थ' नावाचे कुंड लागते. हे गोदावरीचे आदिम उगमस्थान मानले जाते. कुंडाजवळ एक शंकराचे मंदिर आहे. काही ठिकाणी तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष सापडतात.

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]