ब्रह्मकमळ
| या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
ब्रह्मकमळ (शास्त्रीय नाव: Epiphyllum oxypetalum) हे कॅक्टस वर्गातील एक झुडुप आहे. कॅक्टस वर्गातील असूनही त्याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असून, त्याला पानांवरच पावसाळ्यात मोठ्या आकाराची, पांढर्या रंगाची, सुगंधित फुले येतात. ही फुले मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात. फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून केली जाते.
नीलगिरीच्या जंगलात गुलाबी रंगाची ब्रह्मकमळे आढळतात. याची फुले गुलाबी असून, ती दिवसा उमलतात.
निवडुंगाच्या (Cactaceae) कुळात जन्मलेले ‘ब्रह्मकमळ’ हे त्यापैकीच होय. वास्तविक निवडुंग म्हटला की, त्याला काटे असतातच अशी आपली समजूत असते. काटे असणारे फडय़ा निवडुंग (Opuntia) आणि त्रिधारी निवडुंग (Euphorbia) कुंपणासाठी वापरले जातात.
ते वैशिष्टय म्हणजे त्याची कमळासारखी आकर्षक दिसणारी आणि रात्रीच्या वेळी उमलणारी फुले होय. ब्रह्मकमळ - या मराठी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कमळाला ‘बेथेलहॅम लिली’ (Bethelham Lily) असे म्हणतात. त्याचे वानसशास्त्रीय गोत्र ‘एपिफायलम’ असून त्याच्या ‘एपिफायलम फायलॅन्थस्’ आणि ‘एपिफायलम क्रिनॅटम’ अशा दोन जाती आहेत. यातील दुसरी जात आपल्या भारतात आढळते. निवडुंगाच्या कुळात जन्मलेली ही जात मूळ परदेशीयच. मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका इत्यादी भागातून ही जात बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणली गेली.
शाकीय (Vegitative) पद्धतीने पुनरुत्पादन होणाऱ्या या वनस्पतीचा पानासारखा दिसणारा हिरव्या रंगाचा भाग म्हणजेच या वनस्पतीचे खोड होत. अशा प्रकाराच्या खोडांना पर्णकांडे (Phylloclades) असे म्हणतात. या पर्णकांडाला असणाऱ्या खाचातूनच या कमळाचा उगम होतो. पानासारख्या दिसणाऱ्या या पर्णकांडावरच फुले उमलतात. म्हणूनच या वनस्पतीला लॅटीन भाषेत एपिफायलम (Epiphyllum) असे म्हणतात.
पांढऱ्या रंगाची, सुमारे ४ ते १२ इंच लांबीची ही फुले जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्यात लागतात. कळी मोठी होताच सायंकाळी उमलण्याची प्रक्रिया सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत फूल पूर्ण उमलले जाते. ‘निशोन्मीलित’ अशा या ब्रह्मकमळाची शोभा अवर्णनीय आहे. दले, पाकळ्या, पुंकेसर व स्त्रीकेसर इ. विविध भागांची या ब्रह्मकमळातील रचना कुतूहल निर्माण करणारी आहे. म्हणूनच आकर्षक देहयष्टी नसतानाही या वनस्पतीने मानवी जीवनात विशेष स्थान मिळविले आहे. या बाबतीत त्याचा सुगंधही बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. [१]
संदर्भ [संपादन]
- ↑ [This is Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20090728/pun22.htm.दत्ता उमराणीकर] It is a snapshot of the page as it appeared on 25 Dec 2009 08:38:18 GMT.
चित्रदालन [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |