बॉम्बे हाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबई किनारपट्टीच्या १६० कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. ओ.एन.जी.सी. मुंबई हायचे परिचालन करते.

मुंबई हाय तैलक्षेत्राचा शोध १९६४-६७ च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खांबातच्या आखतात केलेल्या अभियानात लागला.१९७४ साली पहिली तेलविहीर खणली गेली.२००४ पर्यंत मुंबई हाय भारताच्या एकूण नैसर्गिक तेल मागणीच्या १४% मागणीची पूर्तता करत होती.