बेस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेस्ट (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) (English:Brihanmumbai Electricity Supply and Transport) मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक पुरवठा कंपनी आहे.बेस्ट चा जन्म १८७३ मध्ये ट्रामवे कंपनीच्या रुपात झाला.आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्ट ने वाडी बंदर येथे नोव्हेंबर १९०५ मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले त्यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीजपुरवठा करण्याची जवाबदारी आली.१९२६ पासून बेस्ट ने बस गाड्या चालवायला सुरुवात केली आणि १९४७ मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली. आणि आता बेस्टचा स्वंतंत्र असा कारभार चालतो (महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही)

बेस्ट हि भारतातल्या सगळ्यात मोठ्या परिवहन सेवांपैकी एक मानली जाते.मुंबईच्या कुठच्याही भागात जायला बेस्ट ची सेवा आहे.नवी मुंबई ,ठाणे ,मीरा-भाईंदर अश्या बाजूच्या शहरांमध्येही बेस्ट ची सेवा आहे.भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट" "खरच बेस्ट ला बेस्टच म्हणावे लागेल."

इतिहास[संपादन]

बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिकेत "बॉम्बे ट्रामवे १८७४" नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड हीने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणाऱ्या ट्राम धावू लागल्या व नंतर जास्त गर्दी होत असल्याने १९२० मध्ये डबलडेकर ट्राम चालवायला सुरुवात केली. बेस्ट ची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्राफर्ड मार्केट या मार्गावर धावली.मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले पण तेव्हा बेस्ट ची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मनात असत कारण ट्राम हेच आवाक्यातले साधन होते. म्हणून बससेवा मुंबईने पूर्णपणे आत्मसात केली नव्हती ते व्हायला थोडा वेळ लागला. सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरु केली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरु झाल्या. पहिली "लिमिटेड" बस १९४० मध्ये कुलाबा ते दादर धावली. दुसऱ्या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी "बेस्ट" मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बे चे मुंबई झाले म्हणून "बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" च नाव बदलून "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" असे ठेवण्यात आले.


बाह्य दुवे[संपादन]

  • बेस्टचे संकेतस्थळ [१]
Best cbd wad.jpg
India.Mumbai.02.jpg
BEST-bus-front.jpg
BEST dbl.jpg
BEST-ferry.jpg