बेलिंडा क्लार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेलिंडा क्लार्क (१० सप्टेंबर, १९७० - ) ही १९९१ ते २००५ या काळात ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळलेली महिला क्रिकेट खेळाडू आहे. महिलांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतक नोंदविणारी ती पहिली खेळाडू आहे. [१]जानेवारी २००० मध्ये ऑस्ट्रेलिया दिनाच्या प्रसंगी तिला मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा बहुमान प्रदान करण्यात आला. सध्या ती ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकॅडमीची व्यवस्थापक आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]