बेन्टनव्हिल, आर्कान्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेन्टनव्हिल हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील छोटे शहर आहे. बेन्टन काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ३५,३०१ तर फेटव्हिल-स्प्रिंगडेल-रॉजर्स या नागरी क्षेत्राची लोकसंख्या ४,६३,२०४ इतकी होती. या शहरात वॉलमार्ट या जगातील सगळ्यात मोठ्या दुकानमालिकेचे मुख्यालय आहे.[१] या शहराची स्थापना १८३७च्या सुमारास आधी ओसेज या नावाने झाली.[२] १८४१मध्ये मिसूरीमधील थॉमस हार्ट बेन्टन या राजकारण्याच्या नावे या शहराचे पुनर्नामकरण करण्यात आले व १८७३मध्ये ही वसाहत अधिकृतरीत्या शहर म्हणून मान्य झाली.[३][२]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. शेफर, स्टीव. With Wal-Mart At 10-Year Highs, Some Shareholders Want Directors Shown The Door. Forbes.
  2. २.० २.१ साचा:Cite thesis
  3. [[[:साचा:GNIS 3]] Bentonville, Arkansas]. Geographic Names Information System. United States Geological Survey.