बेगम अकबर जहान अब्दुल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेगम अकबर जहान अब्दुल्ला (मार्च २४, इ.स. १९१७-इ.स. २०००) या भारतीय राजकारणी होत्या. त्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८४च्या निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीर राज्यातीलच अनंतनाग मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या जम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सद्यकालीन केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या मातोश्री होत..