बॅटल ऑफ ब्रिटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॅटल ऑफ ब्रिटन अथवा ब्रिटनची लढाई (जुलै १० १९४० - ऑक्टोबर ३१ १९४०); जर्मन वायुसेनेने (लुफ्तवाफे) दुसऱ्या महायुद्धात जुलै १९४० ते ऑक्टोबर १९४० दरम्यान इंग्लंडच्या शाही वायुसेनेवर (रॉयल एयरफोर्स) हवाई प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्लंडवर केलेल्या योजनाबद्ध आक्रमणांना बॅटल ऑफ ब्रिटन म्हणून संबोधले जाते. या संज्ञेचा उल्लेख सर्वप्रथम पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १८ जून १९४० रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केला.