बुसान एशियाड मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुसान एशियाड स्टेडियम (कोरियन: 부산아시아드주경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या बुसान शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ५३,८६४ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ आशियाई खेळ स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते. तसेच २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे[संपादन]