बुलबुल
बुलबुल, अर्थात वल्गुवदाद्य पक्षिकुळातील लाल बुडाचा बुलबुल |
|
| शास्त्रीय नाव | वल्गुवदाद्य |
|---|---|
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | पिक्नोनोटिडी (Pycnonotidae) |
बुलबुल अर्थात वल्गुवदाद्य (शास्त्रीय नाव: Pycnonotidae, पिक्नोनोटिडी ;) हे चटकाद्या श्रेणीतील पक्ष्यांचे एक कुळ आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] वर्णन
बुलबुल मध्यम आकारमानाचे, थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे पक्षी आहेत. यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बाकदार असते. यांचे पाय लहान आणि तुलनेने अशक्त असतात, पंख लहान आणि गोल असतात आणि त्या मानाने यांचे शेपूट लांब असते. यांच्या मानेच्या मागील बाजूस केसांसारखी विकसित पिसे असतात. बुलबुल नर आणि मादी बहुदा दिसायला सारखेच असतात. हे जोमदार आवाजात गाणारे म्हणून ओळखले जातात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाळले जातात.
[संपादन] आवाज
लाल बुडाच्या बुलबुलाचा आवाज (सहाय्य·माहिती)
[संपादन] आढळ
या पक्षिकुळातील जाती मुख्यत्वे आफ्रिका आणि आशिया खंडांत आढळतात.
[संपादन] खाद्य
फळे, कीटक, मध हे बुलबुलांचे मुख्य खाद्य आहे.
[संपादन] घरटे
बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत दडविलेले असते. बुलबुल माद्या एकावेळी २ ते ५ अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उबविणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.
[संपादन] चित्रदालन
[संपादन] अधिक वाचन
- डॉ. म.वि. आपटे (इ.स. १९६४). प्राणिसृष्टी भाग दुसरा. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. (मराठी मजकूर)
- मारुती चितमपल्ली. पक्षिकोश. साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, मार्च २००२. (मराठी मजकूर)
- रिचर्ड ग्रिमेट, टिम इनस्किप, प्रशांत महाजन. दक्षिण भारतातील पक्षी. बीएनएचएस फिल्ड गाइड्स, २००५. (मराठी मजकूर)
- सलीम अली. द बुक ऑफ इंडियन बर्ड्स. ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस. (इंग्लिश मजकूर)
- सलीम अली व एस. डिलन रिपली. अ पिक्टोरियल गाइड टू द बर्ड्स ऑफ द इंडियन सबकाँटिनेंट. ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस. (इंग्लिश मजकूर)
- रिचर्ड ग्रिमेट, कॅर्ल इन्स्किप, टिम इन्स्किप (इ.स. २०१०). पॉकेट गाइड टू द बर्ड्स ऑफ द इंडियन सबकाँटिनेंट. (इंग्लिश मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
- इंटरनेट बर्ड कलेक्शन - बुलबुलांची प्रकाशचित्रे व व्हीडिओ (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |