बी.के.एस. अय्यंगार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बी.के.एस. अय्यंगार
जन्म १४ डिसेंबर, १९१८ (1918-12-14)
बेल्लूर, म्हैसूरचे राज्य (आजचा कर्नाटक)
मृत्यू २० ऑगस्ट, २०१४ (वय ९५)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे योगाचार्य
पेशा योगासन प्रशिक्षक, लेखक

बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार (कानडी: ಬೆಳ್ಳೂರು ಕೃಷ್ಣಮಾಚಾರ್ ಸುಂದರರಾಜ ಐಯ್ಯಂಗಾರ್; १४ डिसेंबर १९१८ - २० ऑगस्ट २०१४) हे एक भारतीय योग प्रशिक्षक व लेखक होते. त्यांना अय्यंगार योगा ह्या हठ योग पद्धतीचे जनक मानले जाते. अय्यंगार हे जगातील सर्वोत्तम योग प्रशिक्षकांपैकी एक मानले जात असत. भारतभर व जगभर योगासने लोकप्रिय करण्याचे श्रेय अय्यंगारांना दिले जाते.

अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना १९९१ साली पद्मश्री, २००२ साली पद्मभूषण तर २०१४ साली पद्मविभूषण हे पुरस्कार बहाल केले. २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी हृदयधक्क्याने त्यांचे निधन झाले.

बाह्य दुवे[संपादन]