बिबट्या
| बिबट्या Late Pliocene or Early Pleistocene to Recent |
||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
भारतीय बिबट्या
|
||||||||||||
| प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
|
||||||||||||
| शास्त्रीय नाव | ||||||||||||
| Panthera pardus Linnaeus, 1758 |
||||||||||||
बिबट्या ,बिबळ्या किव्हा वाघरू हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे.
बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्या स्वरुपामधे बरेच साधर्म्य असले, तरी बिबट्या हा जॅग्वार पेक्षा आकाराने लहान असतो. तसेच जॅग्वारच्याही त्वचेवर गुच्छाकृति छप्पे असले तरी,त्याचा छप्प्यांमधे काळे ठिपके असतात, जे बिबट्याचा छप्प्यांमधे नसतात.
याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात. खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे.
- मुख्यत्वे चित्याचे ठिपके हे भरीव असतात व बिबट्याचे ठिपके हे पोकळ असतात.
- चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची शरीरयष्टी बहुतेक मांजराप्रमाणेच भरीव असते.
- बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व मनुष्यवस्तीतील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंद करतात.
अनुक्रमणिका |
[संपादन] व्युत्पत्ती
महाराष्ट्रात जे बिब्बा नावाचे झाड आढळते त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठुन ठिपके तयार होतात, यावरुन मराठीत बिबट्या हे नाव पडले आहे.
[संपादन] वर्णन
[संपादन] काळा बिबट्या
काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाचा अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता नेहमीचे ठिपके दिसतात.
काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात, जिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाम व नेपाळ मध्ये आढळतात. आफ्रिकेमधे ते माउंट केन्याचा जंगलांमधे आढळतात.
[संपादन] खाद्य
इतर मोठ्या मार्जारांपेक्षा बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते व प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो. सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य हे खुर असलेले प्राणी आहेत, पण ते माकडे, क्रुंतक, सरीस्रुप, उभयचर, पक्षी व कीडे देखील खातात. कधीकधी ते इतर लहान शिकारी देखील खातात(उदा. कोल्हा).
भारतात ते चितळ, सांबर, भेकर, चौशिंग व वानर यांची शीकार करतात. मात्र त्याला त्याचा लहान् आकारामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठं सांबर किव्हा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. वाघ किव्हा इतर मोठ्या मार्जारांपेक्षा तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावांशेजारी सुद्धा. अशा ठिकाणी राहणारे बिबटे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात[१]. रशियामध्ये ते सायबेरीयाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात.आफ्रीकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची(ॲंटीलोप) शिकार करतात.
[संपादन] उपप्रजाती
- भारतीय बिबट्या
- श्रीलंकी बिबट्या
- आफ्रिकी बिबट्या
- उत्तर चीनी बिबट्या
- चीनीभारतीय बिबट्या
- जावन बिबट्या
- अरबी बिबट्या
- अमूर बिबट्या
- कॉकेशीयाई बिबट्या
[संपादन] संदर्भ व नोंदी
- ↑ धामनकर,अतुल. अरण्यवाचन. (मराठी मजकूर)