बालाजी तांबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बालाजी तांबे (२८ जून, १९४० - १० ऑगस्ट, २०२१) हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. इ.स. २०२२ मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.[१]

बालाजी तांबे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडील वासुदेव तांबे शास्त्री आहे. बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांनी आयुर्वेद शिकविला. पुढे बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळविली.

आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले.

इ.स. २००३ सालापासून बालाजी तांबे यांनी संपादित केलेली फॅमिली डॉक्टर नावाची पुरवणी पुण्याच्या दैनिक सकाळबरोबर दर शुक्रवारी प्रकाशित होते. साम नावाच्या मराठी दूरचित्रवाहिनीवर त्यांचे आठवडाभर रोज भगवद्‌गीता या विषयावर प्रवचन होते. ’गीता योग’ या नावाने ही प्रवचने २०११सालापासून सुरू होती.

वयाच्या ८१ व्या वर्षी पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.[२]

डॉ. बालाजी तांबे, आत्मसंतुलाना गावाचे संस्थापक होते, जे एक जगप्रसिद्ध होलिस्टिक हीलिंग सेंटर आहे. ते केवळ आयुर्वेद क्षेत्रातील तज्ञ नव्हते तर ते आध्यात्मिक गुरू देखील होते. विशेषतः हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आणि इतर जुनाट आजारांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी त्यांनी आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून जगभरात ख्याती मिळवली आहे.

तांबे यांच्या नुसार,

असे म्हटले जाते की "आयुर्वेद हा केवळ एक औषधाचा प्रकार नाही तर तो जीवनाचा मार्ग आणि निरोगी शरीर, मन आणि आत्मा यांचा मार्ग आहे".

त्यांची जर्मनी आणि भारतातील केंद्रे ही एकमेव ठिकाणे आहेत जिथे पारंपारिक, आयुर्वेदिक पंचकर्म उपचार अजूनही दिले जातात. पंचकर्म उपचार नंतर संतुलन पंचकर्म मध्ये विकसित केले गेले जे योग, ध्यान आणि उपचार संगीतासह एकत्रित केले गेले. संतुलन पंचकर्म हा एकमेव उपचार आहे जो शुद्धीकरण प्रदान करतो मन आणि शरीराच्या पाच घटकांचे. पाच तत्वांमध्ये हवा, पाणी, आकाश, अग्नी आणि पृथ्वी यांचा समावेश होतो जे आपल्या शरीराशी एकरूप असतात. तांबे यांनी आजार निर्माण होण्यापूर्वीच शरीरातील असंतुलन शोधण्यासाठी नाडी पदनाम वापरण्याची अभूतपूर्व क्षमता विकसित केली आहे.

पुस्तके[संपादन]

  • आत्मरामायण (गुजराती भाषेत)
  • आयुर्वेद उवाच. भाग १, २.(मराठी)
  • आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराती, इंग्रजी)
  • आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी)
  • चक्र सुदर्शन (मराठी)
  • मंत्र आरोग्याचा
  • मंत्र जीवनाचा
  • वातव्याधी
  • श्री गीता योग - शोध ब्रह्मविद्येचा (इंग्रजीत Peacock Feathers) (१८ भाग). (प्रकाशनाधीन)
  • श्री रामविश्वपंचायतन (मराठी)
  • संतुलन क्रियायोग (मराठी)
  • स्त्रीआरोग्य
  • स्वास्थ्याचे २१ मंत्र. (भाग एकाहून अधिक.)
  • Living Meditation through Om Swarupa (४ भाग)
  • Santulan Kriya Yog (SKY)
  • Shri Gita Tarot: Shri Krishna Answers Your Question (Set of 61 Divine Cards, इंग्रजी-मराठी)
  • The Untold Secrets Of Life

बालाजी तांबे यांच्यावरील आरोप[संपादन]

'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकाद्वारे पु्त्रप्राप्तीचा प्रचार करून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी २०१५ साली नोव्हेंबरमध्ये अहमदनगर जिल्हा सर्जनकडे पुस्तकाचे लेखक बालाजी तांबे, प्रकाशक आणि विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर संबंधितांकडून खुलासे मागवण्यात आले होते. हा विषय आयुर्वेदाशी संबंधित असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे तज्‍ज्ञांचे मत घेण्यासाठी पाठवण्यात आला. तज्ज्ञांनी बालाजी तांबेंवर पुत्रप्राप्‍तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवला होता. बालाजी तांबे यांचा हेतू पुत्रप्राप्‍तीचे उपाय सुचवून लिंगनिवडीबाबतचा आहे हे पुस्तकातून सिद्ध झाले असल्याचे विद्यापीठाच्या समितीने म्हटले आहे. या पुस्तकाचा गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबतच्या जनजागृती मोहिमेवर परिणाम झाल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले होते. एकूणच या पुस्तकामुळे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला होता.[३][४] तथापि कोर्टाने बालाजी तांबे यांनी फक्त जुन्या ग्रंथांतील माहिती दिली असल्याचे कारण सांगून कोर्टाने त्यांना या खटल्यातून निर्दोष ठरवले आहे. तसेच या निकालाच्या आधारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावरील खटला देखील रद्दबातल करण्यात आला.[५][६]

पुरस्कार[संपादन]

  • आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ’रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ अवॉर्ड (२०१४).
  • डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. ही मानद पदवी (जानेवारी २०१७)
  • मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार ( २६ जानेवारी २०२२) [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Balaji Tambe : श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री जाहीर". eSakal - Marathi Newspaper. 2022-01-26 रोजी पाहिले.
  2. ^ "आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन". Loksatta. १० ऑगस्ट २०२१. १० ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "बालाजी तांबेंवर सरकारने दाखल केला गुन्हा".
  4. ^ "Balaji Tambe: बालाजी तांबेंवर सरकारकडून गुन्हा दाखल".
  5. ^ "M/S. Triveni Prakashan, Through vs The State Of Maharashtra And Anr on 3 June, 2019 Bench: V.K. Jadhav". indiankanoon.org. Archived from the original on 2022-01-26. २६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "इंदुरीकरांना मोठा दिलासा, खटला चालविण्याचा आदेश रद्द". महाराष्ट्र टाइम्स. Archived from the original on 2022-01-26. २६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.