बहिरी ससाणा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बहिरी ससाणा ( शास्त्रीय नावः falco peregrinus ) हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे. गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख, चपळ शरीर, व अतिशय वेगवान हालचाली करुन उडणार्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे. डोळ्याच्या बाजूचे पिसांचे कल्ले या वरुन हा पक्षी ओळखता येतो.
बहिरी हे मूळचे नाव अरबी असून अरबी भाषेत बहारी असे म्हणतात. इंग्रजीत हा पेरेग्रीन फाल्कन या नावाने ओळखला जातो. आखाती देशात याला माणसाळवून शिकारीसाठी वापरतात.
एकेकाळी हा पक्षी अतिशय दुर्मिळ झाला होता. परंतु ७० ते ८० च्या दशकात या पक्ष्याच्या संख्येने पुन्हा उचल घेतली आहे. दुर्मिळ होण्याचे मुख्य कारण डिडिटी चा मोठया प्रमाणावरील वापर होता.