म्यानमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बर्मा या पानावरून पुनर्निर्देशित)
म्यानमार
Myanmar long form.svg
म्यानमारचा संघ
म्यानमारचा ध्वज म्यानमारचे चिन्ह
ध्वज चिन्ह
म्यानमारचे स्थान
म्यानमारचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी नेपिडो
सर्वात मोठे शहर यांगोन
अधिकृत भाषा बर्मी
इतर प्रमुख भाषा जिंगफो, शान, कारेन, मोन, तमिळ
सरकार संपूर्ण लष्करी हुकुमशाही
 - राष्ट्रप्रमुख थान श्वे
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ४ जानेवारी इ.स. १९४८ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ६,७६,५७८ किमी (४०वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.०६
लोकसंख्या
 - २००९ ५,००,२०,०००[१] (२४वा क्रमांक)
 - घनता ७३.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७१.७७२ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (७९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,०३९ अमेरिकन डॉलर (१६२वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२००७) 0.586[३] (मध्यम) (१३८ वा)
आंतरराष्ट्रीय कालविभाग म्यानमार प्रमाणवेळ (यूटीसी +६:३०)
आंतरजाल प्रत्यय .mm
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९५
राष्ट्र_नकाशा


म्यानमार (अधिकृत नाव: बर्मी: Myanmar long form.svg, इंग्लिश: Republic of the Union of Myanmar, रिपब्लिक ऑफ यूनियन ऑफ म्यानमार; अन्य नावे: बर्मा, ब्रह्मदेश) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश - म्हणजे १,९३० कि.मी. - लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे.

ऐतिहासिक काळापासून म्यानमारमधील वांशिक विविधता राजकारणावर व समाजगतिकीवर प्रभाव टाकत आली आहे. आधुनिक काळातदेखील या देशाच्या राजकीय पटलावर वांशिक तणावांची पडछाया पडल्याचे दिसून येते. इ.स. १९९२ सालापासून म्यानमारची शासनव्यवस्था जनरल थान श्वे यांच्या नेतृत्त्वाखालील लष्करप्रणीत आघाडी सरकाराच्या नियंत्रणात आहे.

[संपादन] संदर्भ

  1. Department of Economic and Social Affairs Population Division. "World Population Prospects, Table A.1" (PDF). 2008 revision. United Nations. 12 March 2009 रोजी मिळवले.
  2. बर्मा (म्यानमार). आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (ऑक्टोबर इ.स. २०१०).
  3. मानवी विकास अहवाल २००९. मानवी विकास निर्देशांकातील कल. सारणी 'ग' (पीडीएफ). संयुक्त राष्ट्रे. ५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये