फ्राउनहोफर गेजेलशाफ्ट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फ्राउनहोफर गेजेलशाफ्ट ही जर्मनीतिल आघाडिची संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेला संस्था म्हणणे चुकिचे ठरेल संशोधन कंपनी संबोधले जाणे जास्त बरोबर ठरेल. या कंपनीचे संपुर्ण जर्मनी मध्ये अनेक ठिकाणी विविध ५८ शाखांमध्ये संशोधन चालते. प्रत्येक शाखेचे संशोधन हे ठराविक विषया संबधित असते. फ्राउनहॉफर चे संशोधन मुख्यत्वे तांत्रिक स्वरुपाचे असुन विविध उद्योग क्षेत्रांशी निगडित तंत्रज्ञान सुधारणांवर जास्त भर असतो.