फोक्सवागन
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
फोक्सवागन ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग (लोउर सॅक्सोनी राज्यात) असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे (VW) या संक्षिप्तनामानेही कंपनीची ओळख आहे. [१]. फोक्सवागन च्या कंपनी समूहात अनेक वाहन उत्पादक आहेत व त्यातील काही वाहन उत्पादनात अतिशय प्रसिद्ध आहेत. ऑडी, बेंटले मोटर्स, बुगाटी ऑटोमोबाईल्स, सियाट, स्कोडा ऑटो, पोर्शे व अवजड वाहने बनवणारे स्कानिया ही उत्पादके फोल्क्सवागन उत्पादन समूहात मोडतात. फोक्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे. नोव्हेंबर २००९ मध्ये फोक्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे.[२] एकविसाव्या शतकात फोक्सवागनने भारतातही पाऊल रोवले असून वाहनांच्या विक्रिला प्रारंभ केला आहे.
[संपादन] इतिहास
१९३० च्या दशकापर्यंत कार किंवा तत्सम वाहने आरामदायी प्रकारातील असायची की जी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होती. १९३७ साली नाझी कामगार संघटनेने ही मक्तेदारी मोडून काढण्याकरिता सर्वसामान्याची कार हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यातुन फोक्सवागन कंपनीचा जन्म झाला.
[संपादन] संदर्भ
- ↑ (2008) Manfred Grieger, Ulrike Gutzmann, Dirk Schlinkert: Volkswagen Chronicle, Historical Notes. Volkswagen AG. आय.एस.बी.एन. 978-3-935112-11-6. 2009-12-21 रोजी मिळवले.
- ↑ "Volkswagen Steals Toyota's Crown as World's Largest Automaker" http://autos.yahoo.com/articles/autos_content_landing_pages/1161/volkswagen-steals-toyotas-crown-as-worlds-largest-automaker/