फेसबूक
| फेसबूक | |
| प्रकार | खाजगी कंपनी |
|---|---|
| स्थापना | केंब्रिज, मॅसेच्युसेट्स सन २००४ |
| संस्थापक | मार्क झुकरबर्ग |
| मुख्यालय | पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका |
| महत्त्वाच्या व्यक्ती | मार्क झुकरबर्ग, सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, डस्टिन मॉस्कोविट्झ, उपसंस्थापक |
| उद्योगक्षेत्र | इंटरनेट, संगणक सॉफ्टवेर |
| महसुली उत्पन्न | अंदाजे ८०० दशलक्ष अमेरिकन डॉलर (२००९) |
| कर्मचारी | २०००+ (२०११) |
| संकेतस्थळ | www.facebook.com |
फेसबूक (इंग्लिश: Facebook) हे अमेरिकीतील एक लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः १३ वर्षांहून मोठ्या कोणालाही फेसबूकवर सदस्य म्हणून नोंदणी करता येते. सदस्यांना आपल्या ओळखीच्या (व फेसबुक सदस्य असलेल्या) इतर व्यक्तिंच्या खात्याशी 'मित्र/मैत्रीण' म्हणून जोडणी करता येते. आपल्या मित्रमंडळींना संदेश अथवा फोटो (छायाचित्रे) पाठवणे, सर्व मित्रमंडळींना दिसेल / कळेल अश्या रितीने एखादी घोषणा करणे, ह्या व इतर अनेक सोयी फेसबूकवर उपलब्ध आहेत. अमेरिकेबाहेर फेसबूकची लोकप्रियता मर्यादित आहे. उदाहरणार्थ, भारत, ब्राझील अश्या विकसनशील देशांमध्ये फेसबुकशी मिळतीजुळते गूगल कंपनीचे 'ऑर्कुट' हे संकेतस्थळ जास्त लोकप्रिय आहे.
फेसबूक वर प्रवेश करताच पहिले पान उघदते ते म्हणजे होम पेज (मुखप्रुष्ट). ह्या पानावर सदस्याच्या मित्रमंडळींनी प्रकाशित केलेल्या घोषणा व फोटो दिसतात. ह्या घोषणा व फोटोंवर सदस्य आपली मते लिहू शकतो. सदस्याने जर आपल्या घोषणा तसेच फोटो सर्वांकरीता प्रकाशित केले तर त्या सदस्याच्या सर्व मित्रमंडळींना त्यांच्या मुख्प्रुष्टावर त्या घोषणा दिसतात.
फेसबूक वरील दुसरे पान आहे "प्रोफाईल पेज". हे पान चार भागात विभागले आहे. ह्यातील माहिती पानावर सदस्याची महिती आढळते. उदा- सदस्याचे नाव, जन्म तारीख, निवास स्थान, राजकीय कल, आवडी/निवडी ईत्यादी. सदस्याचे फोटो "अल्बम" ह्या पानावर दिसतात. सदस्याच्या फेसबूक वरील मित्रमंडळींची सुची "फ्रेड्स्" ह्या पानावर दिसते. तर सदस्याच्या मित्रांनी सदस्याकरीता लिहिलेल्या घोषणा "वॉल" ह्या पानावर दिसतात्.
[संपादन] शोध
मार्क झकरबर्ग नामक युवकाने महाविद्यालयात असताना आपल्या विद्यापीठाच्या जनतेसाठी एका सोशल वेबसाइट ची स्थापना केली, नंतर त्याची प्रसिद्धी व आवाका इतका वाढला की आज फेसबूक सर्वांसाठी उपलब्ध आहे.