फिल्मफेअर पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिल्मफेअरचे पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
फिल्मफेअर पुरस्कार
पुरस्काराचे प्रयोजन चित्रपट पुरस्कार
प्रस्तुतकर्ता फिल्मफेअर
देश भारत
प्रथम पुरस्कार इ.स. १९५४
अधिकृत संकेतस्थळ

फिल्मफेअर पुरस्कार (इंग्लिश: Filmfare Awards) हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेअर अवॉर्ड्‌स असे झाले.

१९५६ सालापासून फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जात आहे. फिल्मफेअर पुरस्कारांची तुलना अनेक वेळा हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कारांसोबत केली जाते.

पुरस्कार[संपादन]

२०१२ सालापर्यंत एकूण ३७ श्रेण्यांसाठी फिल्मफेअर पुरस्कार दिला जात आहे.

मुख्य पुरस्कार[संपादन]

समीक्षक पुरस्कार[संपादन]



तांत्रिक पुरस्कार[संपादन]

  • सर्वोत्तम कथा
  • सर्वोत्तम पटकथा
  • सर्वोत्तम संवाद
  • सर्वोत्तम ॲक्शन
  • सर्वोत्तम कला दिग्दर्शन
  • सर्वोत्तम पार्श्वसंगीत
  • सर्वोत्तम चलचित्रकला
  • सर्वोत्तम संकलन
  • सर्वोत्तम नेपथ्य
  • सर्वोत्तम ध्वनीमुद्रण
  • सर्वोत्तम विशेष परिणाम
  • सर्वोत्तम वेषभूषा

विशेष पुरस्कार[संपादन]

  • लाइफटाइम अचिव्हमेंट
  • विशेष भूमिका
  • सर्वोत्तम सीन[मराठी शब्द सुचवा]
  • नव्या होतकरू संगीतकारासाठी आर.डी. बर्मन पुरस्कार

विक्रम[संपादन]

हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]