फायरफॉक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोझिला फायरफॉक्सची उबूंटू लिनक्सवर घेतलेली झलक

मोझिला फायरफॉक्स (इंग्लिश:Mozilla Firefox) हा एक 'मोझिला कॉर्पोरेशन'ने विकसित केलेला इंटरनेट ब्राउझर न्याहाळक अथवा विचरक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे. लोकप्रियतेच्या दृष्टीने फायरफॉक्स इंटरनेट एक्सप्लोररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा इंटरनेट ब्राउझर म्हणजेच न्याहाळक आहे व इंटरनेट एक्सप्लोररचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी समजला जातो. बऱ्याचवेळा फायरफॉक्ससाठी इंग्लिश FF व मराठीत फाफॉ हे संक्षिप्तरूप वापरले जाते. विनामूल्य उपलब्धता, सुरक्षितता हे फायरफॉक्सचे काही फायदे आहेत.

या शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव न्याहाळक मराठी भाषेतही उपलब्ध आहे. याचे मराठीत संपुर्ण भाषांतर केले गेले आहे.

तांत्रिकदृष्ट्या, फायरफॉक्स मोझिला कॉर्पोरेशनच्या 'गेको' 'लेआऊट इंजिन'चा (HTML Renderer Layout engine) वापर करतो. फायरफॉक्स मायक्रोसॉफ्ट_विंडोज, लिनक्स, ऍपल मॅक ओ.एस्. व युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या इतर काही ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालतो. फायरफॉक्सची सर्वात नवीन आवृत्ती 2.0.0.12 आहे, की इ.स. फेब्रुवारी २००८ पासून उपलब्ध आहे. फायरफॉक्स 'मोझिला पब्लिक लायसन्स' ह्या परवान्याखाली उपलब्ध आहे, व फायरफॉक्सचा स्त्रोत (Source code) हा मोझिला पब्लिक लायसन्स (MPL) आणि जी.पी.एल्. (GPL) ह्या दोन्ही परवान्यांखाली उपलब्ध आहे.[१]

फायरफॉक्सचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच खिडकीत अनेक उप-खिडक्या वापरायची सोय (tabbed brosing). हा ब्राउझर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या इंटरनेट एक्सप्लोरर पेक्षा सुरक्षित आणि सुलभ समजला जातो व कदाचित त्यामुळे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] मराठी टंक बदलण्याची सुविधा

मराठी अथवा देवनागरी टंक बदलण्याची सोय फायरफॉक्समध्ये आहे. दुवा: http://tdil.mit.gov.in/download/GISTYogeshN.htm येथून उतरवून घ्या. येणारी फाईल बहुदा संचित अथवा झिप केलेली असते. अन-झिप करून घ्यावी लागते. त्यातल्या टीटीएफ एक्स्टेंशच्या फाईल्स CDACOTYGB.TTF, CDACOTYGN.TTF, CDACYGIT.TTF कंट्रोल पॅनल मध्ये फाँट्स नावाच्या फोल्डर मध्ये पेस्ट करून घ्याव्यात.

फायरफॉक्स सुरु करून त्याच्या टुल्स > ऑप्शन्स > कंटेंटस् मधील टाइम्स अथवा जो असेल तो टंक काढून टाकावा. व फाँट फोल्डर मध्ये जोडलेला टंक घ्यावा. योग्य तो आकार घेता येईल. उपक्रम अथवा इतर युनिकोड टंक वापरणारी संकेतस्थळे या टंकात चांगली दिसतात.

[संपादन] फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा

Firefoxdic.JPG

फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या. इंटरनेट एक्स्पोअर वापरणाऱ्यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते मला माहीत नाही. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.

एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता.

विकिपीडिया:शुद्धलेखन चिकित्सा सुधारणा प्रकल्प : डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी. (वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)[२]

[संपादन] हे सुद्धा पहा

इंटरनेट एक्सप्लोरर आणि त्या खाली जगातील वापरात क्रमांक २ मराठी मोझिला- न्याहाळक,फायरफॉक्स

[संपादन] बाहेरील दुवे

[संपादन] संदर्भ

  1. मोझिला कोड लायसन्स
  2. [१]सदस्य:शंतनुओक