प्रीती झिंटा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| प्रीती झिंटा | |
| जन्म | ३१ जानेवारी १९७५ शिमला, हिमाचल प्रदेश, भारत |
| कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कारकिर्दीचा काळ | १९९८ - चालू |
| प्रमुख चित्रपट | दिल चाहता है कल हो न हो दिल से |
प्रीती झिंटा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा जन्म जानेवारी ३१, १९७५ रोजी शिमला येथे झाला. तिने हिंदी भाषा शिवाय तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश भाषा चित्रपट सुद्धा अभिनय केला आहे. गुन्हेगारी मानसशास्त्रातून पदवी मिळवल्यानंतर प्रीतीने १९९८ साली दिल से या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दिल से तसेच त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सोल्जर या चित्रपटांसाठी प्रीतीला सर्वोत्तम नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेर पुरस्कार देण्यात आला. तिच्या दिल चाहता है, कल हो ना हो आणि सलाम नमस्ते यासारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या आहेत.दोन्ही गालां वरच्या खोल खळ्या आणि मधाळ डोळे ही प्रीती झिंटा हीची जमेची बाजु.