प्रबळगड - मुरंजन
प्रबळगड - मुरंजन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
| प्रबळगड | |
| नाव | प्रबळगड |
| उंची | २३०० फूट |
| प्रकार | गिरीदुर्ग |
| चढाईची श्रेणी | कठिण |
| ठिकाण | रायगड, महाराष्ट्र |
| जवळचे गाव | {{{गाव}}} |
| डोंगररांग | माथेरान |
| सध्याची अवस्था | व्यवस्थित |
मुंबई-पुणे हमरस्त्यावर जाताना दिसनारा हा नावाप्रमाने बलवान असनारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधुन घेतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इरशाळगड असा चहुबाजूंनी वेढलेला हा किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बदरान वर नजर ठेवण्यास असावा. किल्लावारील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौध्द कालाशी जोडता येतो त्यांच्यावरील मनूष्य निमि॔त गुहांमुळेच उत्त्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन. बहमनीच्या कालात हा किल्ला आकारात आला.
[संपादन] ऐतिहासिक घटना
नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्त्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरुन निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फो॓जा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे निसटून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघुन गेले. नंतर कोकणात जंजिर्या सिध्दिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चो॓लला पोर्तुगीजांकडे गेले पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरु झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेल हरवून जावळी तब्यात घेतली, त्यावेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादे ह्याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड ठेवण्यात आले. पूढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानूसार मोगलाना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोदला. मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्याशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला तत्पूर्वी राजपूत स्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावनीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.
[संपादन] गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे.
- गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पान्याच्या टाक्या सुध्दा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी बाटल्या घेणे आवश्यक आहे.
- प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुभ्रिक्षतेमुळे तो विचार मागे पडला.
- गडावर तीन चार ईमारतींनचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत.
- मात्र गडावरुन माथेरानचे विविध पाँईट फार सुंदर दिसतात.
[संपादन] बाह्य दुवे
[संपादन] संदर्भ
- Kamal Shrikrishna Gokhale. Chhatrapati Sambhaji. Navakamal Publications. http://books.google.com/books?id=43gBAAAAMAAJ&source=gbs_navlinks_s.
- Radhey Shyam. The Kingdom of Ahmadnagar. Motilal Banarsidass Publisher. p. 28. ISBN 9788120826519. http://books.google.com/books?id=5C4hBqKdkEsC&source=gbs_navlinks_s.
- Ambika Sharma. "Prabalgad – Glory at its best". http://www.mumbaimirror.com/article/127/200904062009040613232881192e4a8f0/Prabalgad-%E2%80%93-Glory-at-its-best.html.
- Murlidhar Balkrishna Deopujari. About this book Shivaji and the Maratha art of war. Vidarbha Samshodhan Mandal. p. 61. http://books.google.com/books?id=iF8MAAAAIAAJ&source=gbs_navlinks_s.
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||