प्युनिकचे पहिले युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्युनिकचे पहिले युद्ध
प्युनिक युद्धे यातील एक भाग
First Punic War 264 BC.jpg
इ.स.पू. २६४ भूमध्य समुद्र, लाल रंगातील रोमन साम्राज्य तर करड्या रंगातील कार्थेज
दिनांक इ.स.पू. २६४ - इ.स.पू. २४१
ठिकाण भूमध्य समुद्र, सिसिली
परिणती रोमचा विजय
प्रादेशिक
बदल
सिसिली रोमन साम्राज्याचा भाग बनले.
युद्धमान पक्ष
रोमन साम्राज्य प्राचीन कार्थेज
सेनापती
मार्क्स ॲटिलिऊस रेग्यूलस हमिल्कर बार्का

प्युनिकचे पहिले युद्ध (इ.स.पू. २६४ ते इ.स.पू. २४१) हे रोम आणि कार्थेज यांच्यात सलग वीस वर्षे चाललेले युद्ध होते. यालाच पहिले फोनेशियन युद्ध असेही म्हटले जाते. हे यंद्ध मुख्यत: समुद्रात लढले गेले होते. रोम आणि कार्थेज या दोन शहरांमध्ये भूमध्य समुद्रात असणाऱ्या सिसिली बेटाचा ताबा घेण्यासाठी हे युद्ध लढले गेले.

पार्श्वभूमी[संपादन]

रोम आणि कार्थेज या दोन शहरांमध्ये भूमध्य समुद्रात समृद्ध असे सिसिली बेट होते. रोम आणि कार्थेज या दोघांचाही या बेटावर डोळा होता. ग्रीकांनी एपिरसचा राजा पिर्‍हस याची मदत घेऊन रोमवर आक्रमण करण्याची तयारी केली होती. पिर्‍हसच्या स्वारीचा धोका समोर असल्यामुळें रोमनांनीं व कार्थेजियनांनीं एक होऊन परस्पर संरक्षक करार केला. रोमन व कार्थेजियन लोक आपसांतील भांडणे तात्पुरतीं विसरून समान शत्रूशीं लढण्यासाठीं एक होऊन एका झेंड्याखालीं जमले. त्यांनीं आपसांतील मतभेद पुढें मिटवावयाचें असें ठरविलें. फारशी अडचण न पडतांच रोमने पिर्‍हसवर विजय मिळाला व नंतर रोमनें कार्थेजकडे नजर वळविली. कार्थेजियन लोक आरमारी युद्धात हुषार होते. हमिल्कर बार्का हा कार्थेजियनांचा या युद्धातील पुढारी होता. त्यामुळे सुरूवातीला रोमनांना अनेकदा पराजयाचा सामना करावा लागला पण सरतेशेवटी या युद्धात रोमनांचाच विजय झाला.